विपश्यना ध्यान साधना काळाची गरज ॲड. सुलेखाताई कुंभारे.
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Webportal online.
कामठी/नागपुर : 22 सप्टेंबर 2025
संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये अराजकता,अशांतता तसेच नैसर्गिक आपत्तीचे प्रसंग ओढावलेले आहेत, अश्या परिस्थितीत लोकांनामध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे या सर्व प्रसंगावर मात देण्याकरिता विपश्यना ध्यान साधनेची अत्यंत गरज असल्याचे मत ड्रॅगन पॅलेस विपश्यना केंद्राच्या संस्थापिका ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेस विपश्यना केंद्राच्या 8 व्या स्थापना दिना निमित्त वरील मनोगत व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या की, ज्या पध्दतीने शरीराला निरोगी ठेवण्याकरिता योगाचे महत्व आहे. त्याच पध्दतीने तनाव मुक्त जीवन जगण्याकरिता विपश्यनाची अत्यंत गरज आहे. वर्तमान परिस्थितीत विद्यार्थी, युवा, महिला, प्रशासकीय अधिकारी व इतर क्षेत्रात काम करणा-या महिला व पुरुष प्रचंड मानसीक तनावामध्ये जीवन जगत आहेत. या सर्व समाजातील घटकांना तनाव मुक्त करण्यासाठी विपश्यना करणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यामध्ये बाल शिबीर तसेच विद्यार्थी, युवा, प्रशासकीय अधिकारी इत्यादी समाज घटकांकरिता सुध्दा स्वतंत्र निवासी ध्यान शिबीराचे आयोजन करण्यात येईल.

विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलस विपश्यना केंद्राच्या 8 व्या स्थापना दिना निमित्त आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सामुहिक ध्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या सामुहिक ध्यान शिबीराचे शुभारंभ सकाळी 9:00 वाजता करण्यात आले असुन सायंकाळी 4:30 वाजता विपश्यनाचार्य श्री. गोयंका गुरूजी यांच्या आडीयो प्रर्वचन देवून मंगलमैत्री करून शिबीराचा समारोप करण्यात आला. या एक दिवसीय सामुहिक ध्यान शिबीरामध्ये मोठ्या प्रमाणात साधकांनी सहभाग घेवून शिबीराचा लाभ घेतला.
गेल्या आठ वर्षापासुन ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटर येथे नियोजीत केलेल्या वर्षभराच्या कार्यक्रमानुसार नियमित 10 दिवसीय, 3 दिवसीय, व 1 दिवसीय शिबीराचे आयोजन केल्या जात आहे. या शिबीरामध्ये मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोप-यातुन साधक सहभागी होवून ध्यान शिबीराचा लाभ घेत असतात. शिबीरामध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त इतर राज्यातुन सुध्दा साधकांना ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटर येथे शिबीर करण्याकरिता येणे सोयीचे झाले आहे. अशी माहिती ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटरच्या संस्थापिका ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी दिली.
या एक दिवसीय सामुहिक ध्यान शिबीराला यशस्वी करण्याकरिता रेखा भावे, वंदना आळे, सुमल घरडे, शालु सावतकर, राजेश शंभरकर, सुनील वानखेडे, सचिन नेवारे, राजेश गजभिये,अजित बागडे, भैयालाल भोयर, अनिल कांबळे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.


































