प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना अडचणित आणण्याची भानगड असण्याच्या चर्चेला ऊत
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादकं
VANSH NEWS Digital media services.
नवी दिल्ली :24 जुलै 2025.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतेचे कारण सांगुन राजीनामा दिला. परंतु विरोधकांना हे कारण पचनी पडत नाही. कारण एखाद्या उपराष्ट्रपती ने तब्येतीची कारण सांगुन राजीनामा सोमवारी देताच त्यांना शासकीय निवासस्थान ताबडतोब खाली करण्याचे आदेश बघता इतक्या वेगाने ही कारवाई कशी झाली? केंद्र सरकार व उपराष्ट्रपती धनखड यांच्यात खटके उडाले कि काय? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचेशी त्यांचे काही तरी बिनसले त्यामुळे धनखड यांचेकडून मोदी अडचणित तर आले नाही ना अशी राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे.



एरव्ही उपराष्ट्रपती धनखड प्रधानमंत्री मोदीपुढे विनम्रतेने झुकणारे व भाजप पक्षाचे धडाडीचे नेते म्हणून ते ओळखले जातात. नवीन संसद भवनच्या बाजुलाच उपराष्ट्रपती धनखड यांचे नवे उपराष्ट्रपती भवन बांधले असुन राजीनामा देताच सरकारी निवासस्थान सोडण्याचे आदेश होतात धनखड यांचे प्रधानमंत्री मोदी सोबत काहीतरी बिनसल्याच्या चर्चेला दिल्लीत बळ आले.असेही बोलले जात आहे की त्यांनी भाजप नेत्यांसोबत बोलणे ही टाकले आहे.
याआधी कित्येक प्रधानमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, खासदार यांनी सरकारी निवासस्थान विविध कारणे सांगत नवी दिल्ली येथील आपले शासकीय निवासस्थान कित्येक महिने सोडले नाही. परंतु दोन दिवसापूर्वी राजीनामा देताच उपराष्ट्रपती धनखड यांना शासकीय निवासस्थान सोडण्याचे आदेश दिल्याने विरोधकांच्या आरोपांना बळ मिळत आहे. जाट समुदातील प्रभावशाली भाजप नेते म्हणून जगदीप धनखड याना मानले जाते. अशातच ज्याप्रमाणे केंद्र सरकारने धनखड यांना मिळत असवेल्या या दबावपुर्ण वागणुकीमुळे जाट समुदायात भाजपच्या शीर्ष नेत्याविरोधात असंतोष निर्माण झाल्याची सुत्रांकडुन माहिती पूढे येत आहे.
