श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital media services
पिपळा (डाकबंगला) /नागपुर : 17 जुन 2025
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिपळा डाकबंगला येथील ग्रा. पं. सदस्य अतुल पाटील वय 30 वर्षे याची राजकीय वैमनस्यातून चाकू मारून हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 2:30 दरम्यान घडली.

या हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव हिमांशू कुंभलकर वय 19 वर्षे रा. पिपळा डाकबंगला आहे . सूत्रानुसार माहिती पुढे येत आहे की, आरोपी हिमांशु याने खापरखेडा पोलिसांना दिलेल्या बयानात सांगितले की मयत अतुल पाटील ग्रापं सदस्य याने आरोपी हिमांशु कडुन 2500/- रुपये उधार घेतले होते. सायंकाळी साडे चार वाजता आरोपी हिमांशु ने मयत अतुल पाटील यास उधारीचे पैसे मागितले म्हणून मयत अतुल पाटील याने आरोपी हिमांशु यास साडे चार वाजता काल मारले होते. त्याचा बदला म्हणून रात्री आरोपी हिमांशु कुंभलकर याने मयत अतुल पाटील यास जीवे मारले.
परंतु आरोपी हिमांशू कुंभलकर हा गोलमाल उत्तर देत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ग्रा. पं. सदस्य अतुल पाटील हा सायंकाळपर्यंत स्थानिक भाजप नेत्यांसोबत होता. त्यामुळे आरोपी हिमांशू कुंभलकर जे बयान देत आहे ते खोटे आहे असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. भाजप चा ग्रा पं. सदस्य असलेल्या अतुल पाटील चे स्थानिक कांग्रेस च्या जनप्रतिनिधी यांचेसोबत राजकीय वैमनस्य होते. आणि त्याच राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन भाजप ग्रा पं. सदस्य अतुल पाटील याची हत्या झाली असण्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कांग्रेसशी संबधित जनप्रतिनिधी असुन ते फरार असल्याचा आरोप स्थानिक भाजप नेते करीत आहेत. मृतक अतुल पाटील याचे शव पोस्टमार्टेम करिता मेयो रुग्णालयात नेण्यात आले आहे.
ग्रा पं. चे सदस्य राहिलेले अतुल पाटील हे यूवा नेत्रृत्व होते त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांचे स्वतंत्र पैनल 2 वर्षाआधी कांग्रेस पैनल विरोधात ग्रा पं. निवडणुकीत लढले होते. युवक व महिलांची मोठी शक्ती त्याच्या पाठीमागे होती ! अतुल पाटील हा स्वतंत्र एकटाच निवडुन आला, त्याच्या पैनलचे उमेदवार थोड्याशा मतांनी पराभूत झाले होते. परंतु विकासासाठी नेहमी अग्रेसर राहणारे निर्दलीय ग्रा पं. सदस्य अतुल पाटील याने स्थानिक भाजप नेते किशोरभाऊ चौधरी यांचे नेत्रृत्वात भाजपमध्ये मागच्या वर्षी प्रवेश घेतला होता. त्याच्या हत्येमुळे एका युवा नेत्रृत्वास जनता मुकली आहे. त्याच्या हत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
खापरखेडा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असुन या हत्येत सहभागी सुपारी देणारे इतर संशयित आरोपींचा खापरखेडा पोलिस कसुन शोध घेत आहे. नागपूर ग्रामीण भागात पुन्हा एकदा राजकीय गैंगवार व गुन्हेगारी घटनेने डोके वर काढले आहे. नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी यांनी अतितात्काळ या घटनेने गांभीर्य ओळखून आवश्यक ते कडक कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे.
नानागपु जिल्ह्य़ातील सावनेर तालुक्यातील अवैध रेतीतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या रेतीतस्करीत कांग्रेस व भाजप चे छोटेमोठे राजकीय नेते सुद्धा गुंतल्याची चर्चा सुरू असुन रेतीतस्करी चे व या हत्येचे काही कनेक्शन तर नाही ना याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाने चौकशी करण्यासाठी स्पेशल एसआयटी स्थापन करावी जेणेकरुन या भागातील अवैध रेतीतस्करांच्या मुसक्या आवळल्या जातील.
