श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
महादुला नगरपंचायत /नागपुर :18 नोव्हेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील महादुला नगरपंचायत निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक 3 मधुन कांग्रेस पक्षाने पुन्हा एकदा आपली सीट काढण्यासाठी जनसामान्यांच्या संपर्कात असणाऱ्या आम्रपाली सोनारे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली.
काल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस तर्फे प्रभाग क्रमांक 3 मधुन कांग्रेस ने नवा उमेदवार आम्रपाली सोनारे यांनी उमेदवारी दाखल केली. या प्रभागातुन याआधी झालेल्या निवडणुकीत अर्चना मंडपे (सोनारे) यांचा विजय झाला होता. यावेळी त्यांनी पक्षाकडून प्रभाग 3 मधुन उमेदवारी मागितली नव्हती. त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली होती. परंतु कांग्रेस पक्षाने त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारली. त्यानंतर पक्षाने याच प्रभागातील आंबेडकरी समाजातील सक्रीय कार्यकर्त्या आम्रपाली सोनारे यांना उमेदवारी दिली. आम्रपाली सोनारे यांचा त्यांच्या प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे आणि मिळालेल्या संधीचे सोने करणार असे आम्रपाली सोनारे यांनी कांग्रेस पक्षाच्या नेत्यांना शब्द दिला. प्रभागामधील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार जनतेला निराश कधीच करणार नाही असे आम्रपाली सोनारे यांनी मतदारांना आश्वासन दिले आहे.येथुन आम्रपाली सोनारेंचा विजय सुनिश्चित समजला जातो.


































