श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला : 23 डिसेंबर 2025
महादुला नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा हेमलता मनोज ठाकूर सावजी यांचा मुख्यमंत्री यांच्या नागपुर येथील “रामगिरी” निवासस्थानी काल झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व भाजप चे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

महादुला नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची निवडणुक जिंकताच मोठी रैली काढुन राज्याचे महसूल मंत्री व नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कोराडी येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत त्यांचा आशिर्वाद घेतला.


महादूल्याचा विकास हाच संकल्प-हेमलता मनोज सावजी (नवनिर्वाचित नगराध्यक्ष). महादुला शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष हेमलता सावजी यांनी यापूर्वी महादुला नगरपंचायत क्षेत्रात चालू असलेले विकास कामे अधिक गतीने पूर्ण करून रस्ते, वीज, पाणी व स्थानिक गरजूंना मालकी हक्काचे पट्टे, घरकुल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. काल नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या सत्कार कार्यक्रमात भाजपाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक स्वाती ज्ञानेश्वर लांडे, अभिजीत सुभाष ढेंगरे, नंदाताई अरविंद तुरक, अजय संतलाल सोलंकी, गोपाल सिंग नैकाने, वैशाली पवन पखिड्डे, गंगा विजय जैन, सोनु कृष्णा उघडे, संध्या पुरुषोत्तम साबळे, राजकुमार उईके, स्वाती दिलीप पटले तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




































