श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital media services
औरंगाबाद /मुंबई: 4 जुलै 2025
परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत म्रत्यु झाला होता.त्याआधी दोन दिवस पोलिसांच्या अत्याचार सोमनाथ वर झाल्यावर त्यास न्यायालयीन कोठडीत पाठवले तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला परंतु राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सभाग्रुहात याविषयी बोलताना सोमनाथ सुर्यवंशी यांचा म्रत्यु पोलीस कोठडीत पोलिसांच्या अत्याचारामुळे झाला नसल्याचे सांगितले होते. त्यांनी सरळसरळ परभणी पोलिसांना क्लीनचिट दिली होती.याविरोधात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईने मूंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईच्या वतीने जोरदार बाजु मांडली होती! आता सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
परभणी येथे 11 डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलनानंतर नवा मोंढा पोलिस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आले होते. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने राज्य सरकार आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे आणि कुटुंबीयांनी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणीपर्यंत तपास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल अंतिम करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
आज सायंकाळी वंचित नेतै अँड. बाळासाहेब आंबेडकर हे पत्रपरिषद घेऊन सर्व माहिती देणार असल्याची सूत्राकडून समजते.
