मावळे क्रीडा मंडळ पावडदौना च्या वतीने आयोजित एक दिवसीय भव्य कबड्डी स्पर्धेचे झाले उद्घाटन
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
पावडदौना-मौदा/नागपुर :17 आँक्टोबर 2025
मावळे क्रीडा मंडळ, पावडदौना यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मा.जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला गावातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन दिवस गावात उत्साहाचे, आनंदाचे आणि क्रीडामय वातावरण अनुभवायला मिळत आहे.


देवेंद्र गोडबोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“खेळ हे तरुणांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. अशा स्पर्धांमुळे गावात एकोपा, शिस्त आणि निरोगी स्पर्धेची भावना निर्माण होते.”
कार्यक्रमास गावातील माजी सरपंच सतीश भोयर,सुखदेव तिवाडे,गणेश तिवाडे,विनायक गेडेकर ,रोशन भोयर,विरजित भोयर,यशवंत हटवार,ऋषी भोयर,भरतजी गेडेकर,मोरेश्वर गेडेकर,रामचंद्र तिवाडे,जानबा बोरकर,मंगेश तिवाडे,वनवास गेडेकर,सुखदेव हाटवर,किशोर शहारे,लक्ष्मण राऊत,कृष्णा भोयर,प्रवीण हाटवर,आयोजक अथर्व गेडेकर,यश गेडेकर,यश भोयर,यश माकडे,अभिषेख भोयर,हर्षल गेडेकर व मान्यवर, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

































