बोगस रायल्टी स्लीप छपाई व रेतीघोटाळ्याचे तार नेत्यांपर्यंत जुळण्याची दाट शक्यता!
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 9 जानेवारी 2026
नागपूर जिल्ह्यातील सावनेर पाटणसावंगी, खापा येथे चार ठिकाणी ED ने छापे मारले. ही कारवाई रेती तस्करी, बनावट रॉयल्टी आणि मध्य प्रदेशातून राज्यात वाळू विक्री प्रकरणाशी संबंधित आहे. नागपुरातील एक माजी मंत्री काँग्रेस नेते यांच्याशी संबंध असलेल्या लोकांवर ही कारवाई करण्यात आली. मध्य प्रदेशातून मिळणारी रॉयल्टी वापरून नागपूरमध्ये वाळू विकली जात होती. नागपुर चे तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे कार्यकाळात आधी नागपूर पोलिसांनी काही कारवाई केली होती, पण प्रकरण नंतर ED कडे सोपवण्यात आले.
आज 9 जानेवारी 2026 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी या भागांमध्ये पहाटे पाच वाजेपासून रेती तस्करी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मोठी छापेमारी केली आहे.
या कारवाईची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
राजकीय कनेक्शन:
या कारवाईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे आणि कांग्रेसचे माजी मंत्री यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत .
मिळालेल्या माहितीनुसार Ed ची कारवाई, उत्तम कापसे (सावनेर), शरद राय (पाटणसावंगी), विनोद गुप्ता (सावनेर), अमित राय (खापा), लक्ष्मीकांत सातपुते (सावनेर), दादु कोलते (सावनेर), मनोज गायकवाड (पाटणसावंगी) यांचेवर झाल्याची माहिती पुढे आली आहे.
तपासाचे कारण:
हे प्रकरण 2021 मधील मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणलेल्या वाळू विक्रीतील गैरव्यवहार आणि बनावट रॉयल्टीच्या प्रकरणाशी संबंधित आहे. शासनाची रॉयल्टी थकवून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा संशय ईडीला आहे.
कारवाईचे स्वरूप
नागपूर आणि दिल्ली येथील ईडीच्या सुमारे 10 पथकांनी सकाळी 5 वाजल्यापासून 56 पेक्षा जास्त ठिकाणी ही शोधमोहीम सुरू केली.
महत्वाची कागदपत्रे
या छापेमारीत रेती तस्करीशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे ईडीच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महसुल विभागातील भ्रष्टाचार थांबता थांबत नाही. अवैध रेती उत्खनन आणि रेतीतस्करी आजही मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची सुत्राकडुन माहिती मिळत आहे. यामधे महसुल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी गुंतलेले आहेत. रात्री बेरात्री आजही कित्येक रेतीघाटातुन अवैध रित्या रेती उपसा सुरू आहे.रेतीतस्करीत आतापर्यंत कांग्रेसचे समर्थक गुंतलेले असल्याचा आरोप होतोय. परंतु भाजप ची सत्ता आल्यावर तर भाजप चे ही लोक या रेतीतस्करी मध्ये सरसावले ले दिसत आहेत. सत्तापरिवर्तन झाले परंतु रेतीतस्करी काही थांबता थांबत नाही
सावनेर रामटेक, कामठी, मौदा या भागात आजही रेतीतस्करांना राजकीय संरक्षण मिळत चालले आहे. घरकुल लाभार्थ्यांना आजही 5 ब्रास रेती मिळणे कठीण होत चालले आहे. 5 ब्रास रेतीचे सोडा, ती रेती ट्रांसपोर्ट करण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांकडून हजारो रुपये वसुली केले जाते. तेही बेकायदेशीर रित्या. आँनलाईन नोंदणी करुन ही घाट बंद असतात. मग रेती आणायची कुठुन एकीकडे रेतीघाट बंद करुन ठेवायचे पण रेतीतस्करी अवैधरीत्या सुरु आहे. त्यामुळे महसुलमंत्री व महसुल खात्याने यांवर आळा घालणे आवश्यक आहे.




































