श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
बारामती /पुणे :28 जानेवारी 2026
आज बारामती येथे विमान लैंडिंग होत असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवाने म्रृत्यु झाल्याने महाराष्ट्र राज्यावर शोककळा पसरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. मुंबईहून बारातमीकडे विमानाने सकाळीच अजित पवार निघाले होते.
हा विमान अपघात बारामतीत झाला. अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू या विमान अपघातात झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी बारामतीमध्ये सभा असल्याने अजित पवार हे मुंबईहून बारातमीकडे रवाना झाले होते. मात्र, लॅडिंगदरम्यान हा अपघात झाला. सकाळी 8:45 चवेळी दरम्यान विमान जमिनीवर कोसळले, त्यावेळी विमानाला मोठी आग लागली. या अपघातानंतर लगेचच मदतकार्य राबवण्यात आले. पण अजित पवारांसह 6 जणांचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेने राज्यात शोककळा पसरली आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काम बघितले. राज्याच्या राजकारणातील मोठा चेहरा म्हणून अजित पवार यांच्याकडे बघितले जात होते. काका शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत मिळून अजित पवार यांनी सत्ता स्थापन केली होती. राज्यात 3 दिवसाचा दुखवटा : 28 जानेवारी ला सार्वजनिक सुट्टी राज्यातील ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे, त्यांना आदरंजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 28/01/2026 रोजी संपूर्ण राज्यात ‘शासकीय सुट्टी’ आणि ‘राजकीय दुखवटा’ जाहीर करण्यात येत आहे.या निर्णयानुसार खालील गोष्टी लागू होतील:राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आज बंद राहतील.सर्व शैक्षणिक संस्था (शाळा आणि महाविद्यालये) बंद राहतील.सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेले राहतील.आजचे सर्व नियोजित शासकीय मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार 3 दिवसांचा दुखवटा राज्यात जाहीर करण्यात आला.

































