श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital Web portal online
कामठी/नागपुर : 21 आँक्टोबर 2025
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभेतील कामठी नगरपरिषद येथे झालेल्या बहुचर्चित 300 करोड रुपयांपेक्षा अधिक भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नागपुरच्या जिल्हा न्यायालयात दाखल झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व माजी सभापती यांचेसह मुख्य सुत्रधार मुख्याधिकारी यांचेवर न्यायालयाच्या आदेशानंतर FIR दाखल करण्यात आला. या कथित घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आलेल्या शेकडो कोटी रुपयांची अशा पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या व कथित भ्रष्टाचारास जिम्मेदार असलेल्या जनप्रतिनिधी अधिकारी यांची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी राज्य सरकारने अतितात्काळ SIT स्थापन करावी अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी एका पत्राद्वारे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.
नगरपरिषद कामठी येथे करण्यात आलेल्या विविध विकास कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा असून त्यामुळे जनतेच्या हक्काचा पैसा लुटला गेला व कामठीचा विकास रखडला याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कामठी कामठी येथील उघडकिस आलेल्या विकास कामातील भ्रष्टाचार प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी सुलेखाताई कुंभारे यांनी केली आहे.

उल्लेखनीय आहे की नगरपरिषद कामठी येथील विकास कामांमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती व मुख्याधिकारी यांनी संगणमत करून करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण प्रकरण नुकतेच उघडकीस आले असून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहे, त्यानुसार 10 आँक्टोबर 2025 रोजी त्यांच्यावर विविध कलमाद्वारे पोलीस स्टेशन कामठी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सुलेखाताई कुंभारे पुढे पत्रात म्हणाल्या की, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी मागील दहा वर्षात कामठी नगर परिषदेतील विविध विकास कामाकरिता 200 ते 300 करोड रुपयांचा निधी नगर परिषद कामठी ला उपलब्ध करून दिला आहे, असे विविध सार्वजनिक मंचावरून सांगितले. परंतु या विकास निधीचा वापर कामठी शहरात विकास कामाकरिता झाल्याचे दिसून येत नाही अशा परिस्थितीत जनतेच्या हक्काचा पैसा गेला कुठे? असा प्रश्न कामठीतील जनतेला पडला आहे. कामठी मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य अंतर्गत रस्ते खड्डेयुक्त नाल्यांची सफाई नाही इत्यादी अनेक समस्या भेडसावत आहेत, मात्र या विकास कामासाठी आलेला पैसा तत्कालीन लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी यांनी संगणमत करून आपल्या घशात घातल्याचे उघडकिस आलेल्या प्रकरणावरून निश्चित झाले आहे असेही सुलेखाताई म्हणाल्या.
त्यामुळे जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या अशा भ्रष्टाचारी जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या गैरकारभाराची शिक्षा त्यांना व्हावी याकरिता या भ्रष्टाचार प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी कामठीच्या आम जनतेची इच्छा आहे असेही सुलेखाताई म्हणाल्या.
कामठी नगरपरिषद च्या घोटाळ्यापासुन घोटाळ्यापासुन दुर्लक्षित असलेले महसुलमंत्री SIT स्थापन करतील का ?
माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या या पत्रामुळे कामठीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी संदीप बोरकर याचा वणी नगरपरिषद येथील भ्रष्टाचार जगजाहीर असतांना त्याला कामठी येथे कोणी आणले? नगरपरिषद बरखास्त झाल्यावर ही वारंवार तक्रारी/आंदोलने होऊनही प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी कोणाच्या सांगण्यावरून सोपवली? गोंदिया येथे त्याची बदली झाल्यावरही त्याची बदली कोणी थांबवली? माजी नगराध्यक्ष हे कोणाच्या जवळचे म्हणून ओळखले जातात? यांवर आता कामठीच्या राजकारणात राजकीय जाणकारांची खमंग चर्चा रंगली आहे. येत्या नगरपरिषद निवडणुकीतील कथित भ्रष्टाचाराविरुद्ध कांग्रेस च्या च एका पदाधिकाऱ्याने तक्रार केली होती. परंतु 2021 पासुन सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात स्थानिक भाजप नेत्यांची चुप्पी का होती? काय त्यांनी याविरुद्ध एकदाही आवाज का उचलला नाही? काय त्यांचे या भ्रष्टाचारास मुक समर्थन तर नव्हते ना? या भ्रष्टाचाराविरुद्ध न बोलणारे भाजप नेते तेही तेवढेच जबाबदार व दोषी आहेत अशीही चर्चा आहे. 200-300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार न्यायालयाच्या निदर्शनास येतो परंतु कामठी नगरपरिषद येथील मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपचे स्थानिक पदाधिकारी व नेते मुकदर्शक म्हणून राहिले. प्रत्येक घोटाळ्यांवर बारिक नजर असणारे महसुलमंत्री हे देखील या घोटाळ्यापासुन दुर्लक्षित कसे राहिले? यांवर जनतेत सध्या उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
माजी मंत्री तथा महायुतीच्या घटकपक्ष असलेल्या बरिएमं नेत्या अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या कडुन घोटाळ्याच्या सखोल चौकशी साठी एसआयटी स्थापन करण्याच्या मागणीवर आता महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे काय भुमिका घेतात? याकडेही आता कामठी तील जनतेचे लक्ष लागले आहे.









































































