श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपुर : 24 आँक्टोबर 2025
या वर्षी मराठवाड्यासह महाराष्ट्रात 38,35,947 हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. केंद्र सरकारकडून आयात शुल्क सवलतीचा कालावधी वाढविण्यात आल्यामुळे देशांतर्गत कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ‘सीसीआय’ (भारतीय कापूस महामंडळ) खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देणार होते. परंतु अद्याप कापूस खरेदी केंद्रे सुरू झाले नसल्याने दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या घरात विकण्यासाठी ठेवलेला कापुस अत्यंत कमी भावात दलाल /व्यापारी खरेदी करीत आहेत. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांची ही दिवाळी काळी दिवाळी झाली असल्याचा आरोप मुंबई क्रृ.उ.बा.समितीचे उपसभापती हुकुमचंद आमधरे यांनी केला.
केंद्र सरकारने अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप ने भारतावर 50% टेरिफ लावल्यावरही अमेरिकन काँटन आयात केला असुन भारत देशातील शेतकऱ्यांचा कापूस घरात पडुन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळण्याची भीती आहे. कापुस खरेदी करण्यासाठी CCI ने काही जाचक अटी व शर्ती ठरवल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. नागपुर जिल्ह्य़ातील कित्येक भागात उशिरा आलेला मान्सून व त्यानंतर सातत्याच्या पावसामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन घटले. परंतु केंद्र सरकारने अजुनही कापुस खरेदी केंद्रे सुरु करण्याचा निर्णय न घेतल्याने यंदा ची दिवाळी शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी ठरली आहे. कापुस खरेदी करण्यासाठी लावलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. राज्यातील बाजार समित्या केंद्र सरकार चे CCI व राज्य सरकारच्या राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या निर्णयाची वाट बघत असुन लवकरात लवकर सरकारने यांवर निर्णय घ्यावा अशी मागणी मुंबई क्रृ.उ.बा.समितीचे उपसभापती हुकुमचंद आमधरे यांनी केली आहे.


























































