श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
कामठी /नागपुर: 18 मार्च 2025
सोमवार दिनांक 17 मार्च रोजी नागपूर शहरातील महाल परीसरात दोन गटामध्ये राडा होऊन मोठ्या प्रमाणात दंगल घडविण्याचा प्रयत्न झाला, ही बाब अत्यंत दुदैवी असून या घटनेवा बहुजन रिपब्लीकन एकता मंच तर्फे निषेध करण्यात येत आहे.
समाजकंटकांनी परिसरातील निष्पाप लोकांच्या गाड्या फोडल्या, दगड फेक करून दहशत निर्माण करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. दंगलीला थांबविणारे पोलीसांना सुध्दा समाज कंटकांनी सोडले नाही. त्यामध्ये 3 पोलीस उपायुक्त तसेच 30 च्या वर पोलीस कर्मी जखमी झाले.
भारताच्या मध्यभागी असलेले नागपुर शहराला सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक बळकटी देण्याकरीता व शहराला स्मार्ट सिटी बनविण्याकरीता कटीबध्द असलेले केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक परिश्रमाला गालबोट लावण्याचे काम करणा-या समाज कंटकांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी बहुजन रिपब्लीकन एकता मंचच्या संस्थापिका व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुभारे यांनी पत्रकाव्दारे केली.
