श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
मुंबई : 3 मे 2025
पहलगाम येथे 8 दिवसापुर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 27 निरपराध पर्यटक नागरिकांचा म्रृत्यु झाला. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काश्मिरातील पहलगाम येथे न जाता बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय मंचावरून पाकिस्तान ला कल्पना से बढकर जवाब देन्याची बात मोदींनी केली. दुसरीकडे सिंधु जल समजता रद्द करण्याची घोषणा केली परंतु पाकिस्तान ला जशास तसे उत्तर अजुनही केंद्र सरकारकडून पाकिस्तान ला देतांना चे चित्र दिसत नाही. त्याच धर्तीवर आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खा. संजय राऊत यांनी जोरदार टीका करीत म्हटले की? ज्या देशात युद्धजन्य परिस्थिती असते त्या देशाचे प्रधानमंत्री हे टंगळमंगळ करीत देशभर फिरत नसतात असा टोला खा. संजय राऊत यांनी लगावला आहे.
ते पुढे म्हणाले की, अशा परिस्थितीत प्रधानमंत्री मोदी हे देशभर विविध कार्यक्रमात हास्यविनोद करीत हजेरी लावत आहेत, त्यांच्या वर्तनातून देशाला युद्धाला समोर जायचे आहे असे दिसुन येत नाही असेही खा. संजय राऊत म्हणाले.
आता देशात विमाने उडवण्याची तयारी आणि युद्धसराव सुरु आहे. आपल्याला चीन व पाकिस्तान सारखे शत्रु राष्ट्रे शेजारी असल्याने युद्धसराव निरंतर सुरु असलाच पाहिजे असेही खा. संजय राऊत म्हणाले. केंद्र सरकारने मीडिया च्या माध्यमातून युद्ध सुर असल्याचे चित्र रंगविले असुन पाकिस्तान वर बॉम्ब टाकल्याने तेथील राज्यकर्ते पळुन गेले आहे असे ही प्रसारमाध्यमातुन चुकीचे रंगविण्यात येत असल्याबाबत खा. संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली.
