श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News digital media services
मुंबई : 7 जुन 2025
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्थापन केलेला ‘फुले शाहू आंबेडकर पुरस्कार’ हा महाराष्ट्रात सामाजिक न्यायाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना दिला जातो. हा पुरस्कार महात्मा फुले, छ. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आदराने गौरवतो. यावर्षी या पुरस्कारासाठी नागपुर जिल्ह्य़ातील कामठी येथील ओगावा सोसायटी ची निवड सामाजिक न्याय विभागाने केली आहे. हा पूरस्कार ओगावा सोसायटी ला मुंबई येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मुंबई येथे विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

सन 1999 साली माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी ओगावा सोसायटी ची स्थापना केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात बुद्धिस्ट पर्यटन स्थळासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र, इंटरनेशनल ड्रेगन मेडिटेशन सेंटर, दादासाहेब कुंभारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ड्रैगन इंटरनैशनल स्कुल ची स्थापना व विस्तार ही दादासाहेब कुंभारे परिसरात ओगावा सोसायटी ने केला आहे. मागील 25 वर्षापासून सामाजिक, धार्मिक, व शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी ओगाला सोसायटी च्या माध्यमातून करण्यात आली. तसेच ओगावा सोसायटी ने सातत्याने या परिसरातून सुशिक्षित बेरोजगार. महिलांना रोजगार निर्माण करुन दिला. माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली ओगावा सोसायटी ने विविध क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य हे फुले, शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना समर्पित आहे.

सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याची नोंद घेऊन अशा संस्थांना पुरस्कार स्वरूप
7.5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एक चांदीचा स्क्रोल, शाल आणि श्रीफळ यांचा शासनातर्फे ओगावा सोसायटी ला मिळणार आहे.
