पुन्हा एकदा कामठी विधानसभा राहुल गांधींच्या निशाण्यावर!
श्री. सुनील उत्तमराव साळवे (9637661378)
मुख्य संपादक
Vansh News digital media services
मुंबई : 7 जुन 2025
कांग्रेस नेता खा. राहुला गांधी यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये आज लिहिलेल्या लेखामध्ये 5 स्टेपमध्ये या षड्यंत्राचा आराखडा मांडला आहे. यामध्ये एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदार, बनावट मतदान, टार्गेट बुथ रिगिंग आणि CCTV/पुरावे लपवण्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या लेखात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83 टक्के मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या सर्व घडामोडींना “Match-fixing” असल्याचे म्हटले आहे. जिथं निकाल आधीच ठरवले होते. शेवटी, ते म्हणतात की “मॅच फिक्स झालेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विष आहे.”

महाराष्ट्रातील नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या मते, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीपासून ते मतदार यादीत बनावट मतदारांची भर आणि मतमोजणीतील गैरप्रकारांपर्यंत एक सुनियोजित कट रचला गेला होता. राहुल गांधी यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्त पत्रामध्ये हा लेख लिहिला आहे.
2024 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतदार अचानक वाढले
राहुल गांधी यांनी आपल्या या लेखामध्ये 2024 विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत काही आकडेवारीही समोर ठेवली आहे. 2019 मध्ये 8.98 कोटी असलेली मतदार संख्या मे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 9.29 कोटी झाली. मात्र, विधानसभा निवडणूक 2024 ला नोव्हेंबर मध्ये ती 9.70 कोटींवर पोहोचली. सरकारी अंदाजापेक्षा (9.54 कोटी) ही आकडेवारी अधिक आहे.
मतदानाच्या दिवशी मतमोजणी 58.22% वरून 66.05% पर्यंत वाढली, म्हणजेच 76 लाख अतिरिक्त मतं झाली. विशेषतः भाजप कमकुवत असलेल्या 85 मतदारसंघांतील 12,000 मतदान केंद्रांवर हे घडलं.
नागपूरमधील कामठी मतदारसंघात भाजपच्या मतांमध्ये 56,000 ची वाढ दिसली, तर काँग्रेसची मते स्थिर राहिली असं राहुल गांधी म्हणालेत.
निवडणूक आयुक्तांची नियुक्ती एकतर्फी
राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्या मुद्यात म्हटलं आहे की, 2023 मध्ये झालेल्या कायद्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री 2:1 बहुमताने निवडणूक आयुक्त नियुक्त करतात. त्यामुळे या निवड प्रक्रियेत विरोधी पक्षनेत्याच्या मताला फारसे महत्त्व नाही. न्यायाधीशांचाही निर्णय केंद्र सरकारच ठरवतं याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
मतदार यादीत बनावट नावे
दुसऱ्या मुद्यामध्ये महाराष्ट्रात मतदारयादीत बोगस नावे घुसडल्याचा आरोप केला आहे. यामध्ये आकडेवारी सादर करताना राहुल यांनी मे 2024 मध्ये महाराष्ट्रातील मतदारसंख्या होती 9.29 कोटी होती. मात्र, नोव्हेंबर 2024 मध्ये ती अचानक 9.70 कोटींवर पोहोचली आणि फक्त 6 महिन्यांत 41 लाखांची वाढ झाल्याचे म्हटले आहे. यातील फक्त 15 लाख मतदारांनी मतदान केले, उर्वरित संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.
बनावट मतदानाने टक्केवारी वाढवणे
राहुल यांनी मतदानाच्या दिवशी 5 वाजता 58.22% मतदान झाले होते असे म्हटले आहे. यामध्ये अंतिम आकडेवारीत ते 66.05% वर गेले. म्हणजे 7.83% अचानक वाढ झाल्याचे सांग त्यांनी सुमारे 76 लाख बनावट मतं घातली गेली असावीत, असा गंभीर आरोप केला आहे.
बोगस मतदानांचे ‘पिनपॉइंट’ टार्गेट
राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे की, 85 विधानसभा क्षेत्रांमध्ये लक्ष्य करून बनावट मतदान झाले. भाजपला अनेक ठिकाणी अवास्तव मतं मिळाली. कम्भ मतदारसंघात 134,000 मतांपैकी भाजपला 119,000 मतं मिळाली. ही 89 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पारनेरमध्ये 1.75 लाख मतदार आणि भाजपला 1.75 लाख मते मिळाल्याचे म्हटले आहे.
पुरावे लपवणे
निवडणूक आयोगाने विरोधकांच्या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचेही राहुल यांनी म्हटले आहे. CCTV आणि EVM फूटेज देण्यास नकार दिला. सरकारने 1961 निवडणूक नियमात बदल करून CCTV डेटा सार्वजनिक होऊ नये असे केले. EPIC कार्डवर एकसारखे क्रमांक दिसले, म्हणजे डुप्लिकेट मतदार असल्याचा गंभीर आरोप राहुल यांनी केला आहे
