कोराडी काँलनीतील धोकादायक बिल्डिंगचे आँडिट होणार केव्हा?
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH News Digital web portal online
कोराडी /नागपूर : 21 मे 2025
नागपूर जिल्ह्यातील कोराडी महाजेनको वसाहतीत आज सायंकाळी 5 वाजता टाईप 8 /12 मधील बिल्डिंग चा सज्जा अचानक पडल्यामुळे सर्वत्र भीती चे वातावरण तयार झाले. या बिल्डिंगचा सज्जा केव्हा ही कोसळु शकतो अशी वारंवार तक्रार देऊनही महाजेनको कोराडी प्रसासनाने याकडे दुर्लक्ष केले.
कोराडी काँलनी वसाहत परिसरात अशा किती धोकादायक बिल्डिंग आहेत ज्या कधीही पडु शकतात याबाबत अजुनही कोराडी महाजेनको प्रशासनाने बिल्डिंग आँडिट केले नसल्याचे समजते. आज ज्या बिल्डिंग चे सज्जा पडला तिथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही परःतु भविष्यात केव्हाही कुठेही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी महाजेनको कोराडी प्रशासनाने आपले कर्मचारी आणि त्यांच्या परिजनांघ्या सुरक्षेच्या द्रृषट्टीकोनातुन अतिताक्काळ धोकादायक बिल्डिंगचे आँडिट करुन जीर्ण इमारती पाडुन त्या ठिकाणचे नागरिक यांना स्थलांतरित करावे आणि नविन इमारतीचे निर्माण करावे जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी या ठिकाणचे नागरिक आरती तरुण छावरिया, विलास डोंगरे, तुषार भोंगाडे? रेणुका यादव यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे याकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी कोराडी काँलनी परिसरातील नागरिकांची इच्छा आहे.
