श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नाशिक : 17 डिसेंबर 2025
राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मोठा झटका, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी क्रृषी मंत्री पदाचा दिला राजीनामा.
राज्याचे कीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारी सर्व खाती अजित पवारांकडे सोपवण्यात आली आहेत. नाशिक जिल्ह्यातील सदनिका घोटाळा प्रकरण माणिकराव कोकाटे यांना चांगलेच भोंवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांची खाती अजित पवार यांच्याकडे सोपवावी अशी शिफारस केली होती. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा राज्यपाल आचार्य देवव्रत यांना सोपवला आहे.

नाशिक सत्र न्यायालयाने 1995 सालच्या सदनिका घोटाळ्यात मंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने त्यांच्या तातडीच्या अटकेचे आदेश दिले असून, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असे नमूद केलं होतं.
माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेली सर्व खाती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवल्यानंतर कोकाटे बुधवारी सकाळीच मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
या प्रकरणामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची आणि आमदारकी जाण्याची टांगती तलवार आहे.नागरी कमाल जमीन धारणा कायदा (यूएलसी) कोट्यातील सदनिका मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मिळवली होती. स्वतः मंत्री कोकाटे आणि बंधू अशा दोघांनाही या सदनिका मिळाल्या. त्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे.


































