श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal Media Services.
मुंबई :12 जुलै 2025
काल विधानसभेत महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक आवाजी मतदानाने सत्ताधारी भाजप महायुती सरकारने पास केले. मुळात हे विधेयक जनसुरक्षा विधेयक नसुन जनविरोधी, असंवैधानिक असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले असुन हे विधेयक मागे घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कोर्टात जाणार अशी सुत्रांकडुन माहिती पुढे येत नही. अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी काल त्यांच्या X अकाऊंट वर ट्वीट केले असुन त्यात त्यांनी म्हटले की,
महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे दडपशाही, असंवैधानिक, अस्पष्टपणे परिभाषित, मनमानी आणि गैरवापरासाठी प्रवृत्त आहे.

दुर्दैवाने, विरोधकांकडून कोणताही निषेध न होता हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले. Vanchit Bahujan Aaghadi आणि त्याच्या सदस्यांनी या विधेयकाच्या निवड समिती चे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना 1 एप्रिल 2025 रोजी 9 पानांचे पत्र लिहून या विधेयकास हरकती घेत हे विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी केली होती. अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी काल लिहिलेल्या ट्वीटमध्ये सांगितले की, 9 पानांच्या पत्रात, आम्ही लिहिले होते की, आम्हाला चिंता आहे की, “नक्षलवादाशी लढण्याच्या नावाखाली”, या कायद्याचा वापर राज्य सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्या किंवा सरकारच्या चुकांबद्दल आवाज उठवणाऱ्यांना गप्प करण्यासाठी केला जाईल.


जर हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाले तर, सरकारच्या नीती, धोरणांविरुद्ध असहमती, निषेध, बंड आणि विरोध व्यक्त करणाऱ्या नागरिक, संघटना, राजकीय आणि धोरणकर्ते यांना गुन्हेगार ठरवण्यास कायदेशीर मान्यता देईल.”
महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे महाराष्ट्राची फुले-शाहू-आंबेडकरांची विचारसरणीला नष्ट करणारे आहे!असे स्पष्ट मत ही त्यांनी व्यक्त केले.
जनसुरक्षा #जनसुरक्षा_विधेयक #balasaheb_ambedkar #devendrafadnavis
#vanchitbahujanaaghadi
#vba
