श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services.
महादुला-कोराडी /नागपूर – 11 जुलै 2025
नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत टी पांईंटवर महाराष्ट्र शासनातर्फे सुरु असलेले Skill Development Centre व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचे काम सुरू असुन ते अत्यंत निक्रृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप कांग्रेसचे माजी सभापती सचिन मानवटकर यांनी एका प्रेस नोटमध्ये केला आहे.

सद्यस्थितीत सुरु असलेले बांधकाम हे ठरवुन दिलेल्या डिझाईन प्रमाणे होत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले असुन या कामांवर प्रशासकीय यंत्रणेचे कंट्रोलिंग नाही असेही सचिन मानवटकर यांचे म्हणणे आहे.
संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करुन त्यास ब्लैकलिस्ट करावे अशीही मागणी सचिन मानवटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री), विभागीय आयुक्त नागपुर तसेच जिल्हाधिकारी नागपुर यांना एका निवेदन केली आहे.



