अवर सचिव यांचे आश्वासन व विनंतीनुसार आमरण उपोषण स्थगित
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital Portal media services.
नागपुर : 13 जुलै 2025
नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी सहायक आयुक्त(गट अ) श्रीमती संघमित्रा ढोके यांना दिव्यांग प्रवर्गातून सेवाज्येष्ठता व पदोन्नती पासुन डावलल्याने त्यांनी आपल्यावर अन्यायाविरुद्ध आवाज उचलला आणि 14 जुलै 2025 पासुन त्यांच्याच शासकीय कार्यालयात आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी शासन व प्रशासनाला दिला होता.श्रीमती संघमित्रा ढोके यांना प्रशासनातुन वाढता पाठिंबा बघता प्रशासनाने नमती भुमिका घेत श्रीमती संघमित्रा ढोके यांची मनधरणी करीत आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली .


महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांनी श्रीमती संघमित्रा ढोके यांना दिलेल्या पत्रात सांगितले की, मुख्याधिकारी संवर्गातील दिव्यांग प्रवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा मानिव दिनांक देण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या 19/07/2024 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार वित्त विभागामार्फत उपसमितीची बैठक दि. 11 जुलै 2025 रोजी पार पडली असुन त्या बैठकीतून दिव्यांग प्रवर्गातील अधिकाऱ्यांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याकरिता वित्त विभागाकडून प्रस्तावित आहे. श्रीमती ढोके यांच्या मागणीच्या अनुषंगाने शासनाकडुन प्राथम्याने कारवाई करण्यात येत असुन आपण उपोषणाचा मार्ग अवलंब करु नये अशी विनंती अ. का. लक्कस अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी श्रीमती ढोके यांना लेखी पत्रातून केल्यामुळे तुर्तास दि. 14 जुलै 2025 पासुन सुरु होणाऱ्या त्यांच्या आमरण उपोषणास श्रीमती संघमित्रा ढोके यांनी तात्पुरती स्थगिती दिली असल्याची माहिती संघमित्रा ढोके सहायक आयुक्त गट अ विभागीय आयुक्त कार्यालय नागपुर यानी कळविले आहे.
