ड्रॅगन पॅलेस परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 27 जानेवारी 2026
“भारतीय प्रजासत्ताक राष्ट्र ज्या भक्कम पायावर उभे आहे, तो पाया म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले ‘भारतीय संविधान’ होय. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये केवळ कागदावरची नसून ती आपल्या जिवंत लोकशाहीचा श्वास आहेत,” असे प्रतिपादन ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रात आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

उपस्थितांना संबोधित करताना सुलेखाताई कुंभारे पुढे म्हणाल्या की, बाबासाहेबांनी आपल्याला जगातील सर्वात मोठे संविधान देऊन शोषित, वंचित आणि विशेषतः महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. आज महिलांना समाजात जे स्थान आणि हक्क मिळाले आहेत, ती सर्व संविधानाची पुण्याई आहे.


बाबासाहेबांच्या एक माणूस, एक मत आणि एक मूल्य’ या विचारामुळेच आज भारताची लोकशाही जगात श्रेष्ठ ठरली आहे. केवळ भाषणातून नव्हे तर कृतीतून संविधान जपण्याचे आवाहन करत त्यांनी सांगितले की, “आपल्याला केवळ संविधानाचे वाचन करायचे नाही, तर त्याचे संवर्धन करायचे आहे. संविधानाचे रक्षण करणे म्हणजेच देशाचे रक्षण करणे होय. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल “येणाऱ्या काळात समाज आणि देशाला अधिक बलवान बनवण्यासाठी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या महामंत्राचा अवलंब करणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण प्रगतीची नवी शिखरे सर करू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला माजी नगर परिषद उपाध्यक्ष अजय कदम, नगरसेवक नियाज कुरेशी, नगरसेवक आकाश भोकरे, छावणी परीषदेचे माजी उपाध्यक्ष भी दिपक सिरीया, दिपंकर गणवीर, उदास बन्सोड, अंकुश बांबोर्डे, सुभाष सोमकुवर, सागर भावे, राहुल यादव, अनुभव पाटील, विनय बांबोर्डे, चंद्रशेखर लांजेवार, सुनिल वानखेडे, राजेश शंभरकर, चंदु कापसे, सचीन नेवारे, भिमराव आळे, सुरज मेश्राम, रजनी लिंगायत, रेखा भावे, माजी नगरसेविका सावला शिंगाडे, वंदना आळे, सुमन घरडे, शालू सावतकर, संगिता मानवटकर, आम्रपाली रामटेके, छाया वाटोळे, गीता गजभिये, भुमीका लोणारे, हरदास विद्यालय, कामठी येथिल मुख्याध्यापक देवेंद्र जगताप व शिक्षक कर्मचारी तसेच ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्याध्यापिका अंबरीन फातीमा व शिक्षक वर्ग, ड्रॅगन पॅलेस च्या धम्मसेवक व धम्मसेविका, दादासाहेव कुंभारे बहुउद्देशिय प्रशिक्षण संस्था व विपश्यना मेडिटेशन सेंटर येथील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी ड्रॅगन पॅलेस येथे भाविकांची अलोट गर्दी

भारतीय प्रजासत्ताक दिनी संपूर्ण देश देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असताना कामठी येथील जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले ड्रॅगन पॅलेस टेम्पल देखील तिरंग्याच्या मनमोहक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. शांतता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या वास्तूला प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेल्या तिरंगाच्या प्रकाशाने एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. रात्रीच्या वेळी ही भव्य वास्तू एखाद्या उजळलेल्या हिऱ्यासारखी भासत होती, हे सौंदर्य टिपण्यासाठी भाविक आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
या रोषणाईमुळे ड्रॅगन पॅलेस परिसराला एक चैतन्यमय स्वरूप आले असून सोशल मीडियावर देखील या सुंदर सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.


































