श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News digital media services.
खापा/नागपुर: 13 जुन 2025
नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा टेंभुरहोड येथील टायगर फोर्ट इको रिसोर्ट मध्ये रात्री अपरात्री चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती गोपनीय सुत्राद्वारे मिळताच अनिल मस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी खापा यांचे नेत्रृत्वात विशाल गिरी (पोलीस निरीक्षक खापा) यांचे एआ पथकाने टेंभुरहोड येथील टायगर फोर्ट इको रिसोर्ट मध्ये 12 जुनच्या मध्यरात्री 2 वाजता धाड टाकली असता रिसोर्ट मालक विशाल मधुकर इंगोले रा. धंतोली नागपुर वय 39 वर्षे यांचेसह आरोपी क्रमांक 2) महिला हिच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक 3)अमित संताराम अपरेजा, रा. रेचल अपार्टमेंट, कमाल चौक, इंदोरा , आरोपी क्रमांक 4)संजय आनंदराव धापोडकर, रा. बिनाकीनगर आरोपी क्रमांक 5) सचिन पाटील रा. सजय गांधी नगर हे त्याच्याकडील चार चाकी वाहनाने महिलांना आणुन रिसोर्ट वर देहव्यापार करवुन घेतात आणि त्या मोबदल्यात पीडित महिलांना पैसे देतात अशी माहिती रिसोर्ट मधील विविध खोल्यात सापडलेल्या महिलांनी सांगितली.

पोलिसांना रिसोर्ट च्या तपासादरम्यान आरोपी क्रमांक 6) मनिष कैलास देशमुख रा. महाकाली नगर, प्लाट नंबर 40 मानेवाडा नागपुर वय 41 वर्षे, आरोपी क्रमांक 7) नितीन रमेश कोक्कडे, रा. मोहाडे आऊट वाडी वय 37 वर्षे आरोपी क्रमांक 8) दिलीप धर्मराज शाहु रा. वाडी आरोप क्रमांक 9) विनोद रामाजी लोहजे वय 49 रा. वार्ड क्रमांक 5,कंट्रोल वाडी नागपुर आरोपी क्रमांक 10) किसन मनिराम येसणे रा. वाडी हे आढळून आले. कुठल्या कारणास्तव ते इथे आले अशी त्यांची माहिती घेतली असता वरील आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु आरोपी क्रमांक 6 ते 10 हे ग्राहक असल्याची माहिती पीडित महिलांनी पोलिसांना दिली.
घटनास्थळी महिलांना देहव्यापार करण्यासाठी आणण्यासाठी वापरण्यात आलेली फोर्ड कंपनीची चारचाकी वाहन क्र. MH 49 BK 4141किंमत 30 लाख रुपये रोख रक्कम 15 हजार रुपये आणि इतर साहीत्यासह एकुण 30,15000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपी क्रमांक 1 ते आरोपी क्रमांक 10 यांचेविरुद्ध 3,4,5,6, 7 स्त्रिया व मूली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम सह कलम 143 भा. न्या. सं. अन्वये गुन्हा दाखल करुन पीडित 8 महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी क्रमांक 1 रिसोर्ट मालकासह आरोपी क्रमांक 4 यांना अटक करुन त्यांना न्यायालयात हजर करुन त्यांचा रिमांड मागितला.
नागपुर ग्रामीण भागात अवैध धंद्यांना आलाय ऊत
नागपुर जिल्ह्य़ातील अनेक गावात निर्माण रिसोर्ट, लाँज येथे अवैधरीत्या देहव्यापार केला जातो याची माहिती स्थानिक पोलिसांना असते तरीसुद्धा अनेक रिसोर्ट वर रात्री उशिरापर्यंत दारु परवाना नसतांना ही अवैध दारुविक्री तसेच देहव्यापार कसा काय चालु राहतो. रात्री 12 च्या नंतर अवैध पार्ट्या तसेच ध्वनी प्रदुषण डीजे यांना कोणाची परवानगी असते. स्थानिक पोलिस परिसरातील लाँन रिसोर्ट यांची वेळोवेळी तपासणी करणात अयशस्वी का ठरतात या रिसोर्ट मालकाकडून स्थानिक बिटमार्शल /पोलिस यांना हफ्ता तर मिळत नाही ना अशा अनेक शःका आता जनतेच्या मनात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावात न देता नागपुर जिल्ह्य़ातील अवैध देहव्यापार अवैध दारुविक्री अवैध सटटापट्टी तसेच अंमली पदार्थाची तस्करी यांवर वेळीच आळा घालण्याची गरज आहे.


