श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
खापरखेडा/ नागपुर : 21 आँक्टोबर 2025 नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदा कोराडी येथे शनिवारी कोराडी नांदा येथील पांडे ले आऊट मध्ये 45 लाख रुपयांची मोठी महाचोरी घडली. मागील 5 वर्षातील ही मोठी जबरी चोरी मानली जाते.तक्रारकर्ता सुरेश चिरकुट भोसले (55, रा. पांडे लेआउट, नांदा, ता. कामठी) हे वेकोलिमध्ये नोकरीला आहेत. ते शनिवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास कुटुंबीयांसह कोराडी (ता. कामठी) येथील महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिरात पूजा करणे व दर्शन घेण्यासाठी गेले होते. घरी राहायला कुणीही नसल्याने त्यांनी दार व गेटला व्यवस्थित कुलूप लावले होते. घरातील सर्व सदस्य बाहेर असल्याची खात्री पटताच चोरट्याने कुणाचेही लक्ष नसताना त्यांच्या घराचे मागचे दार तोडून आत प्रवेश केला.आत शिरल्यावर चोरट्याने बेडरूममधील कपाटाचे कुलूप उघडून आतील 32 तोळे सोन्याचे व 65 तोळे चांदीचे दागिने लंपास केले.
पाच वर्षांतील सर्वात मोठी घरफोडी. चोरी व घरफोडीच्या घटना आता सामान्य होत आहे. मागील पाच वर्षांतील खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही सर्वात मोठी घरफोडी आहे. पोलिसांनी तपासासाठी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाची मदत घेतली होती. गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्यांनी घर व परिसराची पाहणी केली. चोरट्याचा शोध घेण्यासाठी
पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहे. शनिवारी रात्री 8:40 वाजताच्या सुमारास सुरेश भोसले यांच्या घराच्या कम्पाऊंड वॉलवर एक अनोळखी व्यक्ती चालताना दिसली, अशी माहिती भोसले यांचे शेजारी बेलेकर यांनी दिली. त्यावेळी बेलेकर घराच्या अंगणात बसले होते. पळण्याच्या प्रयत्नात त्याच्या पिशवीतील काही वस्तू पडल्या. त्याने त्या लगेच उचलून पिशवीत टाकल्या व पळून गेल्याचे बेलेकर यांनी सांगितले.चांदीच्या दागिन्यांसह 92 हजार रुपये रोख चोरून नेले. दागिन्यांमध्ये सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, चेन, कानातील टॉप्स, लॉकेट असलेली चेन, फॅन्सी पोत, चांदीचे काही दागिने व नाणी यांचा समावेश आहे. चोरट्यांनी दागिन्यांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर देखील चोरून नेला. रात्री 10 वाजताच्या सुमारास घरी परत आल्यावर सुरेश भोसले यांना घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांच्याकड्डून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

एकुण 45 लाखांचा ऐवज केला लंपास
खापरखेडा पोलिसांनी चोरीला गेलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची एकूण किंमत 14 लाख 44 हजार रुपये आकारली असली, तरी बाजारभावाप्रमाणे याच दागिन्यांची एकूण किंमत 44 लाख 18 हजार 645 ,दागिन्यांची किंमत 13 लाख 20 हजार रुपये, 650 रुपये होते. पोलिसांनी 328 ग्रॅम सोन्याच्या ग्रॅम चांदीच्या दागिन्यांची किंमत 40 हजार रुपये आकारली आहे. 92हजार रुपये रोख चोरीला गेल्याने पोलिसांनी 14 लाख 52 हजार हजार रुपये चोरून नेल्याची स्टेशन डायरीवर नोंद केली आहे. बाजारभावाप्रमाणे 328 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची किंमत 43 लाख 16 हजार 400 रुपये व 650 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांची किंमत 1 लाख 2 हजार 245 रुपये होते. रोख ग्राह्य धरली तर चोरट्याने एकूण 45 लाख 10 हजार 645 रुपयांचा ऐवज चोरून नेला.











































