Vansh News Digital Web portal online services
लोणखैरी /खापरखेडा :21 आँक्टोबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील लोणखैरी निवासी आदित्य आंजनकर वय (22वर्ष) नामक युवकांवर दोन अज्ञात चोरटय़ांनी श्रीकृष्ण लाँन, लोणखैरी रोड वर चाकुहल्ला करुन आदित्यजवळील रक्कम घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी च्या दरम्यान घडल्याची सुत्रांनी माहिती दिली.
प्राप्त माहितीनुसार आदित्य आंजनकर हा युवक नविन कोराडी, छिंदवाडा रोडवरील एका ATM मध्ये दिवाळी निमित्त रक्कम काढायला गेला होता. त्याने काही दिवाळीनिमित्त काही खरेदी केले व त्यानंतर तो लोणखैरी कडे गावी जायला बाईकने निघाला असता श्रीक्रृष्ण लाँन जवळ रस्त्यावर 500/- रुपयांचा पडलेला नोट उचलायला उतरला असता अचानक झाडीत दबा धरुन बसलेल्या 2 अज्ञात चोरटय़ांनी आदित्यवर हल्ला करुन त्याच्याजवळील अंदाजे 50 हजार रुपयांची रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न केला. आदित्यने त्या चोरट्यांना प्रतिकार केला असता त्या 2 अज्ञात चोरटय़ांनी चाकुने आदित्य वर हल्ला केला आणि रक्कम घेऊन ते फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राप्त माहितीनुसार बोखारा हद्दीतील गायकवाड ट्रेडर्स जवळील एका खासगी रुग्णालयात आदित्य आंजनकर यांस उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. सध्या आदित्य ची प्रक्रृती ठीक असल्याचे समजते.

रेकी करुन आदित्य यांस लुटले असण्याची शक्यता?
छिंदवाडा रोडवरील विविध ATM आहेत. छिंदवाडा रोडवरील एका ATM मधुन रक्कम काढण्यासाठी गेलेल्या आदित्य वर चोरट्यांनी कदाचित पाळत ठेवली असावी व त्यानंतर तो लोणखैरी गावचा असुन तो गावी जाणार याची पुरेपूर माहिती काढुन च ही लुट व चाकुहल्ला झाला असावा अशी गावात चर्चा आहे. कोराडी नांदा ते बाभुळखेडा रोडपर्यंत कुठेच CCTV यंत्रणा नाही. आणि या भागात पोलीस गश्त फार कमी होते कदाचित यामुळेच या रोडवर अशा घटना नेहमी घडतात. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आदित्य आंजनकर याचे बयान घेतले असल्याचे समजते व पुढील चौकशी खापरखेडा पोलिस करीत असल्याचे समजते.

































- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025





































