श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कोराडी /नागपुर : 16 डिसेंबर 2025.
काल महाजेनको 660 MW वीज प्रकल्पात अज्ञात वायुगळती मुळे युनिट क्र. 9 येथे झालेल्या दुर्घटनेत 15-16 कामगारांत श्वास घेण्यात त्रास सुरू झाला होता. महाजेनको प्रशासनाने अतितातकाळ महाजेनको च्या एंबुलेंस मध्ये आधी कोराडी महाजेनको च्या विद्युत विहार काँलनीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले व त्यानंतर लगेच त्यांना शासकीय मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना आक्सीजन चढविण्यात आले.



महाजेनको कोराडी प्रशासनाने Vansh News Digital Web portal online चैनलला पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, युनिट क्रमांक 9 हे दि. 14 डिसेंबर 2025 रोजी बंद करण्यात आले होते. काल दि. 15 डिसेंबर 2025 रोजी CW लाईनवरील ARV च्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी CW लाईन ड्रेन करण्याची नियमित प्रक्रिया सुरु होती. लाईनवरील व्हेंट उघडताना अज्ञात प्रकारचा वायु गळतीमुळे त्या परिसरात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व कामगारांत अस्वस्थता जाणवु लागली. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांना तातडीने दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथे डाँक्टरांनी सर्वांची तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे निदर्शनास येताच सर्व कामगारांना सुट्टी देण्यात आली असे महाजेनको कोराडी प्रशासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
परंतु अद्याप एक प्रश्न अनुत्तरित आहे, CW लाईनवरील ARV दुरुस्ती करण्यासाठी CW लाईन ड्रेन करतांना एखादा विषारी वायुगळती झाली तर कामगार व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सेफ्टी प्रिकाँशन का घेतले गेले नाही? . एखादा अज्ञात वायुगळती झाला तर पुढे कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाजेनको प्रशासन किंवा संबंधित कंत्राटदार कंपनी ने काय काळजी घेतली पाहिजे? या द्रृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे या निमित्ताने परत एकदा मुख्य अभियंता विलास मोटघरे व त्यांच्या टीमने याकडे गांभीर्याने विचार करावा.



































