श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कोराडी /नागपुर : 15 डिसेंबर 2025
कोराडी महाजेनको 660 MW वीज प्रकल्पात आज झालेल्या विषारी वायुगळती तील जख्मींना कोराडी काँलनीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास 15-18 कामगारांना उपचारासाठी दाखल केले. परंतु इथे स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम नसते. थातुरमातुर बेंडेज पट्टी उपचारासाठी असलेल्या या दवाखान्यातून लागलीच सरकारी दवाखाना मेयो रुग्णालयात नागपुर येथे या सर्व कामगारांना रेफर केल्याची माहिती सुत्राकडुन मिळत आहे.
महानिर्मिती निर्मित कोराडीतील दवाखाना नेमका कुणासाठी? दरमहा लाखो रुपये उधळपट्टींचा फायदा नेमका कुणाला?
कोराडी महाजेनको ने याआधी नवीन कोराडी येथे एका दवाखान्याची निर्मिती केली. त्यात अत्याधुनिक उपचाराचे साहित्य, मशीन उपकरणे बसविली गेली. मग हा दवाखाना आँरेंज सिटी हास्पिटल ला तो भाडेतत्त्वावर चालवायला दिला. पण कधीच कामगारावर उपचार झाले नाहीत. मागील 3-4 वर्षापुर्वी महाजेनको चे हास्पिटल हे भाजपा च्या नेत्यांचे म्हणजे राधिकाताई मेघे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल ला चालवायला दिले. वर्षाला करोडो रुपये यांना अनुदान मिळाले अशी चर्चा आहे. परंतु तिथे उपचारासाठी कायमस्वरूपी डॉक्टरांची टीम उपस्थित नसते. मग राधिकाताई मेघे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल ची गरज काय?आणि याचा फायदा नेमका कोण घेतो? हा प्रश्न येथील कामगार करीत आहेत. कामगारांवर कोणतेही मोफत उपचार इथे होत नाही. येथे उपचारासाठी आलेल्या पेशंटला वानाडोंगरी येथील मेघेंच्या मोठ्या हास्पिटल ला रेफर केले जाते. आणि पेशंटकडुन लाखो रुपये उकळले जातात. असेही म्हणतात.
आज विषारी वायुगळती ने पीडित कामगारांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेतील पीडित कामगारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. अजय गाढवे (46 वर्षे), विनोद राय (36),वसिम अंसारी (33),शहनवाज अंसारी (40), इखलाल सिद्दीकी(40), अक्षय घोडेस्वार (31),रुपेश गाऊत्रे (36),नितेश वानखेडे (34),विनोद निलम (59),सुधीर भडंग (39),राहुल केलेकर (33), महेंद्र यादव (56),कैलास खेरगडे (42),जगमोहन प्रजापती (35),आशिष पाटील (43),




सध्या या कामगारांची प्रक्रृती स्थिर आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना आक्सीजन मास्क चढवले आहे.तर एका कामगाराचे ECG सुरू आहे.

महाजेनको कोराडी कडुन कामगार व कर्मचारी यांच्यात उपचारामध्ये भेदभाव तसेच कोराडी महाजेनकोचा कोराडीतील दवाखाना कुचकामी ठरल्याचा रत्नदीप रंगारी यांचा आरोप
कोराडी महाजेनको 660 वीज प्रकल्पातील वायुगळतील पीडित कामगारांना सरकारी हास्पिटल मेयो येथे उपचारासाठी महाजेनको कोराडी प्रशासनाने दाखल केले. परंतु या घटनेत महाजेनको कोराडी येथील कर्मचारी सौ. पटले व लांडे यांना महाजेनको प्रशासनाने एलेक्सिस हास्पिटल या खाजगी दवाखान्यात दाखल केल्याने महाजेनको प्रशासन कामगार व कर्मचारी यांच्यात भेदभाव करीत असल्याचा आरोप कांग्रेसचे माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी केला. तसेच महाजेनको कोराडी प्रशासनाने करोडो रुपये खर्च करुन तयार केलेले कोराडी येथील हास्पिटल खाजगी पद्धतीने मेघेंच्या परिवारास चालवायला का दिले? कामगारांवर त्वरित उपघार का केले जात नाही या हास्पिटल मध्ये? कामगारांसाठी हे राधिकाताई मेघे हास्पिटल हे कुचकामी ठरले असुन सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या दबावात कोराडी महाजेनको ने स्वतःचे निर्मित हास्पिटल भाडेतत्त्वावर दिल्याने महाजेनको प्रशासनाचे मोठे नुकसान होत आहे तसेच या ठिकाणी उपलब्ध करुन दिलेल्या अत्याधुनिक मशीन धुळखात पडल्याचा आरोप माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी केला आहे. तसेच आज झालेल्या वायुगळती च्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदार कंपनीवर कारवाई करा अशीही मागणी रत्नदीप रंगारी यांनी केली आहे.



































