श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
बुलढाणा : 26 आँक्टोबर 2025
2 दिवसांपुर्वी कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी 21 आमदारांना एका ठेकेदारांकडून दिवाळी गिफ्ट म्हणून 21 डिफेंडर कार दिल्यात असा गंभीर आरोप करुन राजकारणात खळबळ उडवली होती. त्याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्यातील डिफेंडर कार ही 21 वी आहे की 22 वी हे शोधावं लागेल असे सूचक वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी काल केले होते. त्यावर गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सपकाळांनी या कारविषयी शोध घ्यावा असे आवाहन त्यांनी दिले.
शिवसेना (शिंदे गटाचे) आ. संजय गायकवाड हे पुढे म्हणाले की, सपकाळ हे बुलडाण्याचे आमदार असताना एड्सग्रस्त महिलांच्या यादीत चांगल्या चांगल्या महिला होत्या आणि त्यांचे अनुदान सपकाळ यांनी लाटले, त्याचाही त्यांनी शोध घ्यावा असे खळबळजनक वक्तव्य गायकवाड यांनी केले.
आमदारांना पैसे देण्यासाठी राज्य सरकारची कसरत-आ. गायकवाड
दिवाळीनंतर घोटाळा बाहेर काढणार, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैशाची तडजोड करावी लागत आहे. लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता कसरत करावी लागत आहे .वर्षभरात एक काम झाले नाही आणि मग सपकाळ कुठून घोटाळा शोधणार असा सवाल त्यांनी केला. घोटाळा वगैरे काही नाही. नवीन आमदारांना पाच कोटी विकास कामासाठी दिले आहे. ते काही घोटाळा करण्यासाठी दिले नाही असा टोला त्यांनी लगावला.



































