श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal media services.
नागपुर – 31 जुलै 2025
राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण संस्थेच्या संचालक, उपसंचालक यांच्या अटकेनंतर आणखी काल दोन शिक्षणाधिकाऱ्यांना बुधवारी अटक करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी तपासासाठी गठीत ‘एसआयटी’ने विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना अटक केली आहे.




सदर प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले आरोपी व दस्तावेजांच्या तपासानंतर पोलिसांना या प्रकरणात सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार यांचादेखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले. सिद्धेश्वर काळुसे हे 16 मार्च 2024 पासून आजपर्यंत शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर रोहिणी कुंभार या 21 मार्च 2022 ते 15 मार्च 2024 या कालावधीत शिक्षणाधिकारी होत्या. त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी जारी झाल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही बुधवारी अटक केली.



































