श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal media services.
हिंगणा/नागपुर – 1 आँगस्ट 2025
ब.स.पा. हिंगणा विधानसभा कार्यकारणी शिष्टमंडळातर्फे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एमआयडीसी नागपूर शहर यांना निवेदन देण्यात आले. बसपाच्या नागपूर जिल्हा कार्यकारणी महिला सदस्य व हिंगणा विधानसभा महिला संयोजिका ‘दिवंगत शितल मंडपे’ यांच्या हत्येची तातडीने सखोल चौकशी करुन केस संबंधी सर्व बाबींचे सबळ पुरावे चार्जशिट मध्ये जोडण्यासाठी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन तथा प्रकरणाचे तपास अधिकारी सपना निरंजने यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी बसपाचे जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.


एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या पि.एस.आय. वैशाली सोळंके यांनी बसपा शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव मंगेश ठाकरे, नागपूर जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार, जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर, विधानसभा अध्यक्ष सुरेंद्र शेंडे, विधानसभा सचिव श्रावण गोसावी, कान्होलीबारा झोन इंचार्ज सुरेश मानवटकर, वाडी झोन इंचार्ज सुधाकर सोनपिंपळे, विधानसभा महिला संयोजीका उज्वला पूनवटकर, विधानसभा माजी अध्यक्ष महेश वासनिक, धर्मपाल आवळे, आयुश खंडारे, आशिष आवळे यांच्या सह मृतकाची आई सौ. गौतमी चव्हाण, भाऊ अहिसंक चव्हाण, व मृतकाचे दोन्ही अल्पवयीन अपत्ये उपस्थित होते.

































