बुद्ध धम्मसंदेश समितीतर्फे कैंडलमार्च चे ही झाले आयोजन
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
येरखेडा /कामठी : 16 मे 2025
नागपूर जिल्ह्यात येरखेडा कामठी येथे दिनांक दि. 12 मे 2025 रोजी पंचशील बुद्ध विहाराचे उद्घाटन तसेच भगवान गौतम बुद्ध मुर्ती चा लोकार्पण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला माजी मंत्री सुनील केदार, रामटेकचे खा. श्यामकुमार बर्वे, अरुण हुमणे सेवानिवृत्त डीन मेडिकल कालेज नागपुर हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर उपस्थित होते .
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे माजी मंत्री सुनील केदार म्हणाले की जगावर युद्धाचे सावट आहे, अण्वस्त्रांचा दुरुपयोग झाल्यास शेकडो वर्षे भारत पाकिस्तान किंवा अन्य देशात जनता त्लयाचे दुष्परिणाम भोगतील. भारत पाक देशात युद्धाचे सावट असतांना आपण सर्वांना युद्धाची नाही तर भगवान गौतम बुद्धांच्या शांतीच्या विचारांची गरज आहे.. आपण सर्वांनी बुद्धाचा विचार अंगिकारावा असे आवाहन सुनील केदार यांनी जनतेला केला.



येरखेड्यात बुद्धधम्म संदेश समितीतर्फे निघाला कैंडलमार्च
बुद्धजयंती निमित्त बुद्ध धम्मसंदेश समिती तर्फे बुद्ध येरखेड्यात कैंडलमार्च चे आयोजन करण्यात आले होते

याप्रसंगी कार्यक्रमाला येरखेडा च्या माजी सरपंच श्रीमती सरिता रंगारी ,माजी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी.माजी उपसरपंच मंदाताई महल्ले उपसरपंच येरखेडा,माजी सदस्य अनिल पाटील, रोशनी भस्मे ,ज्योती घडले, प्रिया दुपारे, इम्रान नईम, सय्यद गुफरान,राजेश बनसिंगे,आशिष वंजारी, देवेंद्र गवते, विनोद रोडगे,सुदेश नितनवरे, प्रविण भायदे, इमरान नईम, धर्मा बागडे, नवनीत शहारे, चंद्रकांत गिरी,संदीप सुखदेव, विवेक गजभिये, बिट्टू मेश्राम, नरेशजी मोहड, स्वपनिल गायकवाड, महिला मंडळाच्या पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात उपासक व उपासिका उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुद्धधम्म संदेश समिती चे अध्यक्ष अनिल पाटील, सुमेध दुपारे, गौतम तपासे, सचिन गौतम पाटील, कमलेश बागडे, अक्षिता बावनगडे, अजिंक्य पाटील, हर्ष कानफाडे, अंशुल थुल, विनोद बावनगडे यांनी अथक परिश्रम घेतले.
