श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपुर : 11 नोव्हेंबर 2025
नागपुर शहरातील कांग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे पाटील नागपूर महापालिकेत गटनेते होते. अभ्यासू नगरसेवक आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे. आज नागपुर मनपा निवडणुकीसाठी प्रभागाचे आरक्षण जाहीर झाले. प्रफुल्ल गुडघे यांना या आरक्षणाचा मोठा फटका बसला. सुमारे 25 वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला सांभाळून ठेवणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांना नागपूर महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा मोठा धक्का बसला आहे. त्यांचा 38 क्रमांकाच्या जयताळा प्रभागातील तीनही जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहे. गुडधे यांचा बालेकिल्ला आजवर भाजपला सर करता आला नाही.
जयताळा प्रभागातून तीनही उमेदवार काँग्रेसचे निवडून आले होते. यात प्रफुल्ल गुडधे यांच्यासह उज्ज्वला बनकर आणि प्रणिता शहाणे यांचा समावेश होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंगात जयताळा प्रभाग येतो.
कांग्रेस नेता प्रफुल्ल गुडधे यांना त्यांचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेजारच्या वार्डातुन निवडणुक लढण्याशिवाय पर्याय नाही.



































