श्री.सुनील उत्तमराव साळवे(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
सावनेर: 11 मे 2025
वंचित बहुजन आघाडी सावनेर कळमेश्वर विधानसभा जिल्हा नागपूर तर्फे वंचित बहुजन आघाडी चे नेते मा.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी जिल्हा महासचिव अजय सहारे यांच्या नेतृत्त्वात सामाजिक उपक्रम राबवित साजरा केला .



सावनेर मधील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. शासकीय रुग्णालय सावनेर, कळमेश्वर शासकीय रुग्णालय, चिचोली खापरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णांना, वैद्यकीय अधिकारी, नर्स व कर्मचारीगण यांना तसेच संजीवनी माला वृद्धाश्रम खापरखेडा येथील वृद्धांना व कर्मचारी यांना आद.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त फळांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जिल्हा, तालुका व सर्कलचे पदाधिकारी मधुकर बागडे, शांताराम ढोके, अरुण गजभिये, वर्षा बनसोड, मोहन झोडापे, अमोल डोंगरवार, धनेश्वर ढोके, मनोज बागडे, रमा मेश्राम, संजय गोंडुळे,मनीष शेंडे , कौशल्या लोहकरे, वैभव येवले, दद्दू गणवीर, छाया सहारे, सुकेशनी पाटील, माया खोब्रागडे, शांता खोब्रागडे, शकुंतला मेश्राम,सीमा वाहने, सुनील वाहने, सुषमा भौतकर, आनंद बागडे, नंदा बागडे, हंसकला बागडे, महेंद्र बागडे, अशोक बागडे, परमानंद नानवटकर, भाऊराव लांजेवार, एकनाथ मेश्राम,मनोरमा चवारे, अंबादास भौतकर, धनंजय दुपट्टे, कमलेश सहारे,नरोत्तम मडकवार , मिथुन सहारे, अनिल नांदुरकर उपस्थित होते.
