शिक्षकांच्या बोगस शालार्थ आयडी बनवुन करोडो रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती आली पुढे
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services
नागपुर : 15 जुन 2025
संपुर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या शिक्षक भर्ती घोटाळ्यात नागपुरात काल मोठी व पहली कारवाई करीत एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकास अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाची चौकशी एसीपी सुनिता मेश्राम करीत आहेत.
नागपूर जिल्ह्यातील मोहपा येथील विठ्ठल रुख्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप धोटे यांना एसआयटी ने नूकतीच अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठी व पहली कारवाई ही नागपुरात झाली आहे.दिलीप धोटे हे भाजपा कळमेश्वर तालुका चे माजी अध्यक्ष तथा धापेवाडा टेक्स्टाईल कंपनीचे संचालक सुद्धा आहे.दिलीप धोटे हे 1992 पासुन चे भाजप चे सक्रिय पदाधिकारी व नेते आलेत. त्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप आ आशिष देशमुख यांचेसह अनेक भाजप नेत्यांसोबत फोटो सोशल मीडिया वर वायरल आहेत हे विशेष.





भाजप नेते नितीन गडकरी यांचे अगदी जवळचे समजले जाणाऱ्या भाजप च्या स्थानिक नेत्यांवर आता कारवाया सुरू झालेल्या असल्याचे बोलले जात आहे. सावनेर तालुक्यातील टायगर रिसोर्ट असो कि शिक्षकांच्या बोगस शालार्थ आयडी प्रकरण यात सहभागी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक नेत्यांवर कारवाया सुरु झालेल्या दिसत असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरु आहे. एका झोपडीतून महाला पर्यंत मोठा राजकीय प्रवास असलेले भाजप नेते दिलीप धोटे आज गजाआड झाले. कित्येक शिक्षकांकडून 25-30 लाख रुपये घेऊन शिक्षकांना नोकरीवर घेतले नसल्याच्या ही चर्चा सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात आहेत.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील मोहपा येथील विठ्ठल रुख्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेची उच्च प्राथमिक शाळा असुन या शाळेतील जवळपास 7-8 शिक्षकांचे राजाबाक्षा महाल नागपुर येथील अजय मधुकर काळे यांच्या नवयुवक प्राथमिक शाळा यांच्या प्राथमिक शाळेत समायोजन केले होते. या शिक्षकांची शालार्थ आयडी दिलीप धोटेंनी बोगस बनविली होती.यासंदर्भात जेव्हा एसआयटी ने अजय मधुकर काळे यांना चौकशीसाठी सर्व शिक्षकांना सोबत घेऊन जेव्हा बोलावले होते. तेव्हा चौकशी दरम्यान माहिती पुढे आली की, हे शिक्षक नवयुवक प्राथमिक शाळेचे नसुन त्यांना विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्था मोहपा येथुन राजाबाक्षा येथील शाळेत समायोजन केले होते. सन 2022-23 मध्ये या शिक्षकांची शालार्थ आयडी बनविली होती. मध्यंतरी या शिक्षकांचे जे पगार झाले त्यातुन काही रक्कम दिलीप धोटेंना सुद्धा देण्यात आल्याचे अजय काळे यांनी एसआयटी ला सांगितले. शिक्षणाच्या नेमणुकीवेळी अप्रुवल देण्याचा कोणताही प्रकार या ठिकाणी झाला नसल्याने याप्रकरणी या संचालकांना आरोपी बनवुन त्यांना काल अटक करण्यात आल्याची माहिती एसीपी सुनिता मेश्राम यांनी एका व्रृत्तवाहिनीला एका मुलाखतीत सांगितली.
