जिल्ह्यात होणार मोठा राजकीय भुकंप.. अनेक नेते भाजपच्या वाटेवर
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH News Digital web portal online
नागपुर : 17 मे 2025
नागपूर जिल्हा ग्रामीण कांग्रेस कमेटीचे जवळपास 10 वर्षापासून अध्यक्ष राहिलेले माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना कांग्रेस पक्षाने 6 वर्षासाठी बडतर्फ केल्यानंतर दिल्ली तुन बाबा आष्टणकर यांना नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस चे अध्यक्षपदाची धुरा दिली.
परंतु बाबा आष्टणकर यांची जेव्हा पासुन नागपुर ग्रामीण कमेटीचे अध्यक्ष बनले तेव्हापासुन त्यांनी कांग्रेसचे कोणतेही धोरणात्मक पक्षांतर्गत मेळावे/ मोर्चे / आंदोलने घेतले नाही. त्यांच्याकडे दुरद्रृष्टीचा अभाव दिसतोय. कोणतेही नियोजन त्यांच्याकडे नाही. कांग्रेसचे मोठमोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे भाजपात गेले आणि कित्येक जण अजुनही जाण्याच्या मनःस्थितीत आहेत.नागपुर जिल्ह्य़ातील 6 ही विधानसभा क्षेत्रात पक्षांतर्गत बांधणी कमेटी फार्मेशन /वार्ड कमेट्या बनलेल्या नाही बुथ लेवलची कोणतीही बांधणी अजुनही बाबा आष्टणकर यांनी केलेली नाही. आगामी 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आणि बाबा आष्टणकर हे नागपुर जिल्ह्यातील कांग्रेस झोपण्याच्या तयारीत तर नाही ना अशी आता कांग्रेसचे जुने जाणते नेते कार्यकर्ता आपापसात चर्चा करीत आहेत.
नागपुर जिल्हा कांग्रेस कमेटी चे ग्रामीण अध्यक्ष बाबा आष्टणकर हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नातेवाईक आहेत. बाबा आष्टणकर हे बावनकुळेंच्या विजयावर कणखर विरोधी भुमिका घेत नाहीत. राज्यातील महायुती भाजप सत्तेतील मंत्र्यांचा भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, बावनकुळेंचे कांग्रेस फोडाफोडीचे राजकारण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, बोनस, नागपुर जिल्ह्यात हहोत असलेली रेतीतस्करी, घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती न मिळणे, महसुल खात्यातील भ्रष्टाचार यांविरोधातत कोणतेही ठळक आंदोलन, निषेध करतांना कधीच दिसले नाही… मग नेमके बाबा आष्टणकर हे कांग्रेस साठी काम करीत आहेत की त्यांचे नातेवाईक असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी काम करीत आहेत? यांवर आता कांग्रेस नेते नाराज दिसत आहेत.

कांग्रेस श्रेष्ठीकडुन नागपुर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्षपद बाबा आष्टणकर यांना देण्याचा निर्णय चुकला तर नाही ना? यांवर आता मोठी उलटसुलट चर्चा कांग्रेस अंतर्गत गोटात सुरु आहे नव्वळ
पदे घेऊन एसी त बसुन म्हशी हाकलणे सुरु आहे कांग्रेस मध्मौये ग्राऊंड लेवलवर! वस्तुस्थिती शुन्य आहे. बावनकुळेंच्या ग्रृहक्षेत्र असलेल्या कोराडीत कांग्रेस झिरो आहे. कामठी मौदा विधानसभेत होणार मोठा राजकीय भुकंप
नुकत्याच झालेल्या कामठी मौदा विधानसभा निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात जनतेत तीव्र नाराजी असतांना शेवटच्या 13 राऊंडमध्ये बावनकुळे हे 40 हजार मतांनी निवडून आले असा EVM चा निकाल आहे. परंतु प्रत्यक्षात बावनकुळेंना कामठीत मते दिली नसल्याचे ते कित्येक वेळा आपल्या पक्षातील नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आणि सहकारी मित्र पक्षाच्या नेत्यांना म्हणतात असेही खात्रीलायक सुत्रांकडुन माहिती पुढे येत आहे. अशातच बावनकुळेंनी आपला पुर्ण फोकस कांग्रेस पक्ष फोडण्यात केंद्रीत केला आहे. सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघ ही कित्येक कांग्रेस कार्यकर्त्यासी भाजपमध्ग्रे प्रवेश घेतला आहे. कांग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, कामठी न. प. माजी नगरसेविका वैशाली मानवटकर यांचे सह शेकडो कांग्रेस कार्यकर्त्यानी भाजपात प्रवेश घेतला. आता बावनकुळे हे कांग्रेस चे स्थानीय नेते सुरेश भोयर यांचे येरखेडा नगरपंचायत येथील त्यांच्या कट्टर समर्थक यांना फोडण्यासाठी प्रयत्न शील आहेत. आगामी 2_3 महिन्यात येरखेडा नगरपंचायत मध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी कांग्रेस फोडुन भोयर यांना खिळखिळे करण्याचा मानस बावनकुळे यांचा असल्याचे बोलले जाते. त्यासाठी बावनकुळे यांचे आदेशावरून भाजप कार्यकर्ते कारेमोरे, वंजारी, महल्ल्ले, यांचे कांग्रेसच्या माजी पदाधिकारी यांना सतत फोनवर संपर्क ठेवुन आहेत व त्यांना भाजपात येण्याचे आमंत्रण देत आहेत तसेच तुमचे काही खाजगी कामे अडले असतील तर बंगल्यावर चाला असाही निरोप कांग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे आता कामठी मौदा विधानसभेत मोठा राजकीय भुकंप कामठी, येरखेडा नगरपंचायत, बिडगाव नगरपंचायत क्षेत्रात येत्या काही दिवसांत दिसुन येईल. अशी खात्रीलायक सुत्रांकडुन माहिती पुढे येत आहे.
कांग्रेस श्रेष्ठींनी लवकरच याकडे गांभीर्याने घैऊन नागपुर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष पदाची धुरा ही भाजप /बावनकुळेंचै कट्टर विरोधी नेत्यांकडे द्यावी अशी आता कार्यकर्त्यांची मागणी आहे.
