श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Webportal
कोराडी/नागपुर
महाराष्ट्र राज्यामध्ये वीज क्षेत्रात अग्रगण्य असणारी व महाराष्ट्र राज्यातील पहिली ISO:9001:2015 मानांकन प्राप्त विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (1029) च्या 48 व्या वर्धापन दिनानिमित्त औष्णिक वीज केंद्र येथील मनोरंजन केंद्र क्र.2 मध्ये संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025रोजी भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता डॉ.विलास मोटघरे तसेच प्रशिक्षण केंद्र कोराडीचे मुख्य अभियंता सुनील सोनपेठकर यांच्या हस्ते फित कापून तसेच द्वीप प्रज्वलन व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अब्दुल सलाम आणि भारत मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष रवींद्र बारई होते,तर विशेष अतिथी कोराडी वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता शैलेंद्र कासुलकर,भास्कर इंगळे, अधीक्षक अभियंता सचिन भगेवार, किरण नानवटकर मॅडम, कोराडी सरपंच नरेंद्र धानोले,कार्यकारी अभियंता प्रवीण मडावी, कल्याण अधिकारी मयूर मेंढेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित ग्वालवंशी, प्रमुख उपस्थिती माजी केंद्रीय उपाध्यक्ष के.पी.राऊत, बापू देशमुख,गजानन सुपे,शैलेंद्र अर्जितवार तसेच माजी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य अभियंता डॉ.विलास मोटघरे यांनी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेकडून दरवर्षी विविध कार्यक्रम राबविले जात असून या वर्षी रक्तदान शिबिर माध्यमातून राष्ट्रीय सेवा संघटने कडून होत असल्याचे संबोधले.तसेच महानिर्मिती मध्ये विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा मोठा योगदान असल्याचे भाषणातून सांगितले.संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष रवींद्र बारई यांनी संघटनेच्या संघटनात्मक कार्याचा विस्तृत आढावा विषद केला.
रक्तदान शिबिरामध्ये 150 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. तसेच आरोग्य तपासणी करिता बहुसंख्य कर्मचारी, कुटुंबीयांनी हजेरी लावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक झोन अध्यक्ष पुरुषोत्तम साबळे, संचालन शाखा सचिव मिथुन कोडापे आणि संजय सातफळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार महिला प्रतिनिधी सुचिता रोडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सेवकराम बांगडे, संदीप ताजने, सचिन राणे, बाबा पन्नासे, गोवर्धन मारबते, धर्मराज बोडे, सचिन येरगुडे, रवींद्र बोंद्रे,रवी ताजने, गोपाल राठोड, संदिप उरकुडे,पंकज सोमलकर, दिपक किरपाने,सचिन डांगोरे, सचिन पाखरे,चंद्रशेखर कोरडे, मनोहर पुंडे, अरुण भांगे, विजय बावणे,मनोहर बोपचे, दिनेश चालखोर, अनिकेत,धम्मदीप,चंद्रकांत पवार, प्रशांत गाढवे, प्रशांत खाडे, गजानन चव्हाण,पूनम मांडवकर, युवराज रोकडे,करिष्मा रोकडे, छंदूप्रिया भोयर,आदी सभासदांनी अथक परिश्रम घेतले.









































