श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपुर : 28 सप्टेंबर 2025
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 आँक्टोबर 1956 रोजी नागपुरच्या पवित्र दीक्षाभुमीवर आपल्या 5 लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन जगातील सर्वात मोठी ऐतिहासिक धम्मक्रांती केली! त्या दीक्षाभुमीवर मनुवादी शासनाने मागच्या वर्षी अंडरग्राऊंड पार्किंग च्या नावाखाली अवैध खोदकाम केले आंबेडकरी जनतेला अंधारात ठेवून विकासकामांच्या नावाखाली आपली आर्थिक दुकानदारी चालवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दीक्षाभुमी विकास करण्याऐवजी बट्ट्याबोळ केला. आंबेडकरु जनतेने अंडरग्राऊंड पार्किंग ला विरोध केला तै काम बंद पाडले डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या निष्क्रिय संधीसाधू पदाधिकारी यांना याचा जाब विचारला? दीक्षाभुमी परिसरातील खड्डे बुजविण्यात आले परंतु त्यासाठी घाण माती या परिसरात टाकली डस्टच्या नावाखाली. या ठिकाणी ठिकठिकाणी वाढलेले गवत सुद्धा आंबेडकरी अनुयायांनी स्वतः एकत्र येत कापले. परंतु येथील नागपुर चे जिल्हाधिकारी, पालकमंत्री व मुख्यमंत्री यांनी दीक्षाभुमी वर 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना च्या निमित्ताने फक्त मिटिंग घेतल्या. नागपूर DPDC, नागपूर मनपा यांनी अजुनही येथील जागा मागील 7-8 महिन्यात समतल केली नाही. आता सततच्या पावसामुळे दीक्षाभुमी परिसरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे.



2 दिवसांवर धम्मचक्र प्रवर्तन दिन ठेपला असता नागपूर जिल्हा प्रशासनाने अजुनही कोणतीच व्यापक उपाययोजना केलेली दिसत नाही. आज 28 सप्टेंबर 2025 रविवार ला शेकडो आंबेडकरी बौद्ध बांधव दीक्षाभुमी परिसरात पोहोचले असता या परिसरात चिखलाचे साम्राज्य दिसले. लोकांना साधे पायी चालता येत नाही. दीक्षाभुमी एवढी दुरावस्था आजपर्यंत कधीच झाली नाही. हा कोणता विकास आहे? दीक्षाभुमी चे सौंदर्यीकरण आज संकटात आहे. दीक्षाभुमी ही हेरिटेज वास्तु असुन तिचे जतन महत्वाचे होते. परंतु येथील दीक्षाभुमी स्मारक समितीचे पदाधिकारी गवई, फुलझेले, गजघाटे आगलावे हे मनुवादी भाजप नेत्यांच्या नादाला लागले आणि त्यामुळे आज नागपूर च्या दीक्षाभुमी चे हाल बघवत नाही. या स्तुपाला धोका निर्माण झाला आहे.
दीक्षाभुमी येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने येथे येणाऱ्या 20-25 लक्ष अनुयायांसाठी कुठलीही राहण्याची सुविधा, यात्रीनिवास आजपर्यंत कोणत्याच सरकारने बनवले नाही. यात्री निवास नाही, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पालकमंत्री हे भाजपचे च आहेत त्यांना त्यांच्या परिवाराची, बिल्डर व्यापाऱ्यांच्या विकासाची चिंता आहे. त्यांना इतर धार्मिक स्थळावर हजारो कोटी रुपये खर्च करावेसे वाटते. परंतु दीक्षाभुमी चा विकास करण्याची प्रामाणिक इच्छा नाही. दीक्षाभुमीसाठी 40 एकर जागा देण्याचा ठराव होऊन जागा मिळत नाही. यावरुन त्यांची मानसिकता दिसून येते.दीक्षाभुमीवर येणाऱ्या बौद्ध बांधवांची अशी दुरावस्था बघुन किळस येते. केवळ मतांसाठी बौद्ध समाज हवा आहे त्यांना पण विकास नको. आता यातुन बौद्ध बांधवांनी धडा घेण्याची गरज आहे.
दीक्षाभुमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीत दोन गट निर्माण झाले आपसी सत्तासंघर्ष व पदलालसेमुळे दीक्षाभुमी चा विकास रखडला आहे. दीक्षाभुमी स्मारक समितीच्या आजी माजी पदाधिकारी यांनी आता स्वतःहून राजीनामा देऊन बौद्ध अनुयायांच्या हवाले ही दीक्षाभुमी करावी. आंबेडकरी बौद्ध समाज स्वतःच्य देदेणगीतू महामानवाच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीचे केंद्र असलेल्या दीक्षाभुमी चे जतन करेल.




































