उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करायला उमेदवारांची दमछाक
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782) मुख्य संपादक Vansh News Digital Web portal online
महादुला नगरपंचायत /नागपुर : 13 नोव्हेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील महादुला नगरपंचायत निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारात उत्साह खुप आहे परंतु नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया दि. 11 नोव्हेंबर 2025 पासुन सुरु होऊन आज दोन दिवस लोटले. परंतु कोणत्याही राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप महादुला नगरपंचायत येथील निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
मागील 2014 पासुन भाजप ची महादुला नगरपंचायत वर एकहाती सत्ता आहे. सन 2019 ला झालेल्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष राजेश रंगारी हे अवघ्या 300 मतांनी निवडून आले होते. कांग्रेस चे रत्नदीप रंगारी यांचे सोबत अटीतटीची लढत झाली होती. परंतु या निवडणुकीत 2900 मते घेणारे अपक्ष उमेदवार पवन पखिड्डे यांचेमुळे रत्नदीप रंगारी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. जर पवन पखिड्डे हे अपक्ष उमेदवार नसते तर कदाचित रत्नदीप रंगारी यांचा विजय निश्चित झाला असता. पुढे पवन पखिड्डे यांनी रत्नदीप रंगारी यांचा पराभव केल्याचे बक्षिस भाजप नेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवन पखिड्डे यांना दिले. भाजप च्या मतांच्या जोरावर बावनकुळे यांनी पवन पखिड्डे यांना मनोनीत नगरसेवक बनवले आज पवन पखिड्डे हे भाजप वासी आहेत.
गत निवडणुकीत काँग्रेस चे 4 नगरसेवक निवडून आले होते. तर बसपा चा 1 नगरसेवक व एक प्रहार चा अपक्ष उमेदवार निवडून आला होता. कांग्रेसचे मोहसीन शेख यांना तत्कालीन मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांनी जात प्रमाणपत्राची तक्रार करुन कोराडी पो. स्टे.ला FIR केला. शेवटी मोहसीन शेख यांचेविरोधात FIR व कोर्टकचेरी चा त्रास वाढला. भाजप नेत्यांनी नगरसेवक मोहसीन शेख यांना आपल्या पक्षात आणले. नंतर त्यांचे नगरसेवक पदही साबुत राहिले. पण एवढा सगळा उपद्व्याप खटाटोप भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर झाला अशी जनतेत चर्चा होती. कांग्रेस कडे 3 नगरसेवक राहिले. भाजप नेत्यांनी मोहसीन शेख यांना सभापती देखील बनवले. बसपाच्या नगरसेवकास ही आपल्या गोटात आणण्यात ही भाजप यशस्वी झाली पुढे बसपाच्या नगरसेविका सविता पाटील ह्या सभापती बनल्या. सांगण्याचे तात्पर्य भाजप ने विरोधी पक्ष फोडला कांग्रेस ला विरोधात असुन ही कमकुवत पक्ष बनवला. वार्डातील विकासासाठी निधी मिळाला नाही अशी कांग्रेसच्या नगरसेवकांची तक्रार होती.
दुसरीकडे सत्तेत असणाऱ्या भाजप ने दोन मनोनीत नगरसेवक घेतले,पवन पखिड्डे व कांचन कुथे. तत्कालीन भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जवळपास 150 कोटी रुपयांचा विकासनिधी देऊनही महादुला शहर विकासापासून दुर राहिले. नगरपंचायत कार्यालय भाजपच्या ठेकेदारांचा अड्डा बनला. जो नाही तो प्रत्येक गल्लीत भाजप नेत्यांनी ठेकेदार बनवला. ठेकेदारांना 25-50 लाखांचे ठेके काढुन महादुला नगरपंचायत लंबी केली अशी विरोधकांनी वारंवार टीका केली. महादुला नगरपंचायत अंतर्गत प्रत्येक कामात भ्रष्टाचार समोर आला कांग्रेसच्या नेत्यांनी वारंवार महादुला नगरपंचायत चे आँडिट करुन भ्रष्टाचाराची चौकशी ची मागणी केली. परंतु शासकीय यंत्रणा, अधिकारी, पोलिस, प्रशासन भाजप नेते बावनकुळे यांच्या हातात असल्याने महादुला नगरपंचायत च्या भ्रष्टाचाराची कधीच चौकशी झाली. लगतच्या बोखारा ग्राम पंचायत च्या भ्रष्टाचाराची चौकशी चा मुद्दा विधानसभेत चर्चेला आला त्यांवर चौकशी कमेटी लागली दोषींवर कारवाई झाली परंतु महादुला नगरपंचायत च्या विकासासाठी आलेले 150 कोटी कुठे आणि कसे खर्च झाले यांवर भाजप नेते कधीच बोललै नाही अशी कांग्रेस नेते ओरड करीत राहिले.
महादुला नगरपंचायत शहरातील जनता आज पारदर्शी निष्पक्ष, व प्रामाणिक विकासाचे विजन घेऊन नवीन नगरसेवक यांच्या शोधात आहे. भाजपला 10 वर्षे दिली. भाजप च्या कारभाराला व ठेकेदारांना पोसणाऱ्च्या मनोवृत्ती च्या विरोधात आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेवर येथील जनतेचा रोष नाही परंतु भाजप च्या जुन्या नगरसेवकांवर जनतेचा रोष आहे.
महादुला शहरात लाखो रुपये खर्चून 2 गार्डन बनवले, पण त्यात एकही फुलझाडे नाही. अनावश्यक गवत व गाईचे शेण जिकडेतिकडे आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. नागरिकांच्या आरोग्यासाठी सुसज्ज दवाखाना नाही. पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतोय. एकमेव समाजभवन (मंगल कार्यालय) दुर्लक्षित व अस्वच्छ आहे. मुलांसाठी एकही ग्रीनजीम महादुला नगरपंचायत परिसरात मागील 10 वर्षात बनलेले नाही. खेळण्यासाठी मैदान नाही. आठवडी बाजारातील ओटे निर्माणावर करोडो रुपये खर्चले पण बाजार आजही ओट्यावर लागत नाही. खाली रस्त्यावर लागतो.हायवेवरील मटन दुकाने बाजारात स्थलांतरित झालेली नाही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगुन देखील…. मग या 150 कोटी रुपयांत एकही ठोस विकास कार्य सांगु शकत नाही अशी विरोधात चर्चा आहे.
महादुला नगरपंचायत शहरातील जनतेला आता सत्तापरिवर्तन हवे आहे. परंतु प्रबळ विरोधक असलेल्या कांग्रेस मधील गटबाजी संपेना एकमेकांना विचारत नाही अशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी प्रभावशाली नेत्रृत्व नसल्याने संधी चांगली असुनही कांग्रेसला संधीचे सोने करता येत नाही. 2 गटात विभागलेली कांग्रेस भाजपला टक्कर देईल का? बसपा सोबत कांग्रेस ची युती झाल्यास यावेळी भाजप ला विजयापासुन रोकता येईल असाही मतप्रवाह येथे वाहताना दिसतो. तर दुसरीकडे भाजप स्वबळावरच निवडणुक लढणार असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी मीडिया वर सांगितले.
अजुनही कांग्रेस व भाजप, किंवा बसपा वंचित ने आपल्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित केलेली नाही हे विशेष. 16 नोव्हेंबर ला सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.




































