श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर :16 जानेवारी 2026.
महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ग्रृहक्षेत्र असलेल्या कोराडी लगतच्या महादुला नगरपंचायत मध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवली. नगराध्यक्ष हेमलता सावजी यांच्या विजयासोबत भाजप चे 11 सदस्य ही निवडुन आले होते.
उपाध्यक्ष पदी वैशाली पखिड्डे यांची झाली निवड
महादुला नगरपंचायत मध्ये गटनेता म्हणून आधीच अभिजीत ढेंगरे यांची निवड झाली होती. उपाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. भाजप चे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांना उपाध्यक्ष पद देण्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शब्द दिला होता असे याआधी एका मुलाखतीत सेना कार्यकर्त्यांनी सांगितले होते. परंतु ऐनवेळी बावनकुळे यांनी आपला शब्द फिरवला. शिवसेना शिंदे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सचिन वानखेडेंना उपाध्यक्ष पद न दिल्याने ते जरी निराश असले तरी आम्ही भाजप महायुती सोबत आहोत असे सचिन वानखेडेंनी यावेळी सांगितले. महसुलमंत्री बावनकुळे यांच्या आदेशानंतर आज भाजप च्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपाध्यक्ष पदी भाजप च्या सौ. वैशाली पवन पखिड्डे यांची निवड केली. 2019 च्या नगरपंचायत मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष राजेश रंगारी यांचा विजय अपक्ष उमेदवार पवन पखिड्डे यांनी घेतलेल्या 2700 मतांमुळे. कांग्रेसचे रत्नदीप रंगारी यांचा जवळपास 280 मतांनी पराभव होण्यासाठी पवन पखिड्डे हेच जिम्मेदार होते असेही म्हटले जात होते. त्यावेळी बावनकुळेंनी पखिड्डे यांना मनोनित नगरसेवक बनवले होते. यंदा झालेल्या निवडणुकीत भाजप च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमलता सावजी यांना विजयाचे मोठे मताधिक्य पवन पखिड्डे यांच्या पत्नी वैशाली पखिड्डे यांनी मिळवुन दिले. होते. त्यामुळे उपाध्यक्ष पदाची माळ वैशाली पखिड्डे यांच्या च गळ्यात पडेल असे बोलले जात होते. आणि वैशाली पवन पखिड्डे यांची उपाध्यक्ष पदी झालेली निवड ही अपेक्षाप्रमाणे ठरली आहे. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष व मनोनित नगरसेवकांचे अभिनंदन केले.

नवीन 2 मनोनित नगरसेवक ही निवडले
महादुला नगरपंचायत मध्ये मनोनित नगरसेवकांच्या शर्यतीत काही माजी नगरसेवक व भाजप चे काही कार्यकर्ते होते. परंतु ऐनवेळी त्यांचा भ्रमनिरास झाला. माजी नगरसेवक मोसिम शेख व प्रितम लोहसारवा यांची निवड झाली. मनोनित नगरसेवक मोसिम शेख यांची निवड होणारच होती. परंतु प्रितम लोहसारवा यांची निवड भाजप च्या गोटात अस्वस्थ करणारी आहे. महादुला भाजप शहराध्यक्ष राहात असलेल्या प्रभाग क्रमांक 16 मधुन भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. येथुन कांग्रेसच्या प्रतिभा तिलक गजभिये या निवडुन आल्या आहेत. या प्रभागात 2 वेळा भाजप चे पंकज ढोणे विजयी झाले होते. परंतु यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधुन भाजप उमेदवाराचा पराभव होऊनही प्रितम लोहसारवा यांची निवड भाजप च्या काही कार्यकर्त्यांना निराश करणारी असु शकते. तर दुसरीकडे प्रितम लोहसारवा यांच्या नेतृत्वाखाली भाजप शहराध्यक्ष असतांना महादुला नगरपंचायत मध्ये भाजप ला चांगले यश मिळाले म्हणून त्यांना मनोनित नगरसेवक म्हणून घेण्याचे महसूलमंत्री बावनकुळेंनी ठरविले. त्यानुसार आज प्रितम लोहसारवा व मोसिम शेख यांना मनोनित नगरसेवक घेऊन सबका साथ सबका विकास हे धोरण बावनकुळेंनी राबविले.
एकंदरीतच महादुला येथे नगराध्यक्ष हेमलता सावजी व उपाध्यक्ष वैशाली पखिड्डे यांच्या नेतृत्वाखाली महिला राज सुरु झाला असेच म्हणावे लागेल. पण नगरपंचायत मध्ये नेमके महिला सशक्तपणे स्वतंत्र काम करतात की त्यांचे पती त्यांचा कारभार चालवतील? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


































