श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपुर : 23 नोव्हेंबर 2025
30 वर्षांपुर्वी 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू असतांना, गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला. त्यात चेंगराचेंगरी होऊन 123 लोक मृत्यूमुखी पडले आणि शेकडो आदिवासी बांधव जखमी झाले होते. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकर पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला.या घटनेबद्दल सहानुभूती म्हणून नागपूर येथे (0 Mile) शून्य मैलाचे दगडाशेजारी युती सरकारद्वारा गोवारी स्मारक बांधण्यात आले.


दरवर्षीप्रमाणे विदर्भातील हजारो गोंड, गोवारी आदिवासी बांधव या स्मारकास भेट देत या हत्याकांडात म्रृत नातेवाईकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात.
आज नागपुर जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या वतीने 31 व्या स्मृतिदिनी शहीद गोवारी स्मारकास भेट देत पुष्पचक्र वाहित श्रद्धांजली अर्पण केली. या हत्याकांडात मोदीपडाव कामठी येथील करुणा नेवारे या 20 वर्षिय तरुणीचा दुर्देवी म्रृत्यु झाला होता. या घटनेला उजाळा देत आदिवासी गोवारी शहीद स्मारक समितीच्या छोटेखानी कार्यक्रमात माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी 30 वर्षांपुर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेची आठवण करीत तत्कालीन संवेदनहीन सरकारच्या अमानवी अत्याचाराचा निषेध केला. तसेच आदिवासी गोवारी समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या शिका, संगठित व्हा व संघर्ष करा या मुलमंत्राचा आपल्या जीवनात अवलंब करावा, कारण शिक्षणानेच आपली प्रगती शक्य आहे. याआधी घडलेल्या घटनेवरून आपण तत्कालीन सरकारच्या वतीने पीडित गोवारी आदिवासी समाजातील व्यक्तींच्या नातेवाईकांना यथासंभव आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले भविष्यात जेव्हा जेव्हा गोंड, गोवारी आदिवासी समाजास न्याय अधिकाराची लढाई त गरज पडेल तेव्हा आपण तनमनाने आपले योगदान देऊ असेही वचन याप्रसंगी माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी दिले.


याप्रसंगी बरिएमं च्या माजी नगरसेविका वंदना भगत, भीमराव फुसे, राहुल बागडे,चव्हाण जी, अरविंद वाळके, रेखा भावे, रजनी लिंगायत, नंदा गोडघाटे, आदी शेकडो कार्यकर्ते शहीद आदीवासी गोवारी स्मारक येथे उपस्थित होते.

































