पुज्यनिय भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ, पुण्यानुमोदन व धम्मदेसना संपन्न.
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital webportal online service.
कामठी /नागपुर: 2025
स्मृतिशेष महादानदायीका मॅडम नोरीको ओगावा यांच्या सहाव्या स्मृति दिना निमित्त मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनिय भिक्खु संघाच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ, धम्मदेसना व पुण्यानुमोदन कार्यक्रम शेकडो बौध्द उपासक उपासिकांच्या उपस्थित धम्ममय वातावरणात संपन्न झाले.
मॅडम नोरीको ओगावा यांच्या सहाव्या स्मृति दिना निमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्य भिक्खु संघाच्या वतीने सर्व प्रथम ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील तथागत गौतम बुध्दांच्या मुर्ती समोर मेणबत्ती व उदबत्ती लावून वंदना घेण्यात आली तसेच मॅडम नोरीको ओगावा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भिक्खु संघातर्फे मॅडम नोरीको ओगावा यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी जपानी पध्दतीने चॅटींग करून मॅडम नोरीको ओगावा यांना आदरांजली वाहली.


या कार्यक्रमाला कुशीनगर उत्तर प्रदेश येथील पुज्य भदंत सागरा, पुज्य भदंत प्रज्ञाज्योती थेरो, तसेच भिक्खु संघ प्रामुख्याने उपस्थितीत होते. पुज्यनिय भिक्खु संघाच्या वतीने महापरित्राण पाठ व पुण्यानुमोदन कार्यक्रम घेण्यात आले. पुज्य भदंत प्रज्ञाज्योती थेरो, यांनी उपस्थित उपासक उपासिकांना धम्मदेसना दिली त्यामुळे संपूर्ण वातावरण थम्ममय झाले होते. त्यानंतर ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या वतीने उपस्थित पुज्यनिय भिक्खु संघाला भोजनदान व धम्मदान देण्यात आले.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे आयोजित मॅडम नोरीको ओगावा यांच्या स्मृती दिना निमित्त मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते. या प्रसंगी ओगावा सोसायटी, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर, ड्रैगन इंटरनॅशनल स्कूल, ओगावा इंटरप्रायजेस प्रा.लि. यांच्या पदाधिकारी, शिक्षकवृंद, धम्मसेवक धम्मसेविका व ड्रॅगन पॅलेस टेम्पलचे मैत्री संघाचे उपासक उपासिका यांनी सुध्दा मॅडम जोरीको ओगावा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहली.
या प्रसंगी अजय कदम, वंदना भगत, नंदा गोडघाटे, राहुल बागडे, दिपंकर गणविर,सुशिल तायडे, सुभाष सोमकुवर, भरत जवादे, अफजल अंसारी, रवी रंगारी, विष्णु ठवरे, विजय बांबोर्डे, दिलीप बंसोड, अशपाक कुरेशी, रेखा भावे, रजनी लिंगायत, सावला सिंगाडे, प्रतिक पडोले, लालसिंग यादव, तिलक गजभिये, नियाज कुरेशी, रजनी गजभिये, उषा भावे, रेखा पाटील, पल्लवी वासे, विशाखा हाडके, स्वर्णा सुखदेवे, सुजाता डांगे, विणा नगरकर, नितु जामगडे, प्रतिभा नगरकर, राणी नगरकर तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील धम्मसेवक धम्मसेविका इत्यादींनी सुध्दा मॅडम नोरीको ओगावा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


































