श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital portal 0nline Services
तरोडी- कामठी : 28 ऑगस्ट 2025
दिनांक 19 ते 20 ऑगस्ट 2025 रोजी नागपूर जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेमध्ये प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तरोडी (बु) च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले व होणाऱ्या विभागीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी खालील विद्यार्थांची निवड झालेली आहे.

१७ वर्षाखालील मुले
1) तन्मय बर्डे – 56 किलो
19 वर्षाखालील मुले
1) आतिश चौधरी – 52 किलो
2) लोकेश गावंडे – 56 किलो
3) सारंग ठाकरे – 60 किलो
4) रोहित बोकडे – 80 किलो
5) राहुल पटेल – 90 किलो
सर्व खेळाडूंचे प्राचार्य नंदा ठाकरे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्या प्रिया राऊत, क्रीडा शिक्षक सौरभ बोरकर आणि सिद्धांत दानी उपस्थित होते.

































