श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपुर: 11 नोव्हेंबर 2025
वंचित बहुजन आघाडीचे विदर्भातील 2 बड्या नेत्यांचे 6 वर्षासाठी निलंबन केल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य महसचिव किसन चव्हाण यांनी आज जारी केलेल्या पत्रानुसार नागपुर जिल्ह्यातील वंचित चे पदाधिकारी तथा विदर्भ संयोजक असलेले प्रफुल्ल माणके व विवेक हाडके यांचेवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला असुन या दोन नेत्यांना वंचित बहुजन आघाडीतून 6 वर्षासाठी निलंबन केले आहे असे म्हटले आहे.


पुर्व विदर्भातील नागपुर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात वंचित ची संघठनात्मक बांधणी व बैठका घेत पतक्षवाढीवर सातत्याने पुढाकार घेणार वंचित चे पुर्व विदर्भ संयोजक विवेक हाडके व प्रफुल माणके यांच्या वरच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवल्याने राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रफुल्ल माणके यांनी तर गत विधानसभा निवडणुक कामठी मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विरोधात लढविली होती. या निवडणुकीनंतर काही वंचित च्या पदाधिकारी यांनी वंचित चे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांचेकडे वंचित उमेदवारांची तक्रार केली होती अशी सुत्राकडुन माहिती पुढे येत आहे.
या संदर्भात आम्ही वंचित चे नेते विवेक हाडके यांचेशी मोबाईल वर संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही वंचित पक्षासोबत प्रामाणिक काम करीत आहोत परंतु आमच्या पक्षातील काही असंतुष्ट लोकांनी पक्षनेत्रुत्वाकडे चुकीच्या पद्धतीने तक्रारी केल्या. आम्हाला यासंदर्भात अजुन कोणते पत्र आलेले नाही. आम्ही पत्र भेटताच आमची भुमिका पक्षश्रेष्ठींना कळवणार असुन यांवर लवकरच तोडगा निघेल आणि आमचे निलंबन मागे घेतले जाईल हा विश्वास विवेक हाडके यांनी व्यक्त केला.




































