श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपूर : 11 नोव्हेंबर 2025
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपुर्वी नागपूर जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी (VBA)नेत्यात महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बैठक पार पडल्याची माहिती पुढे येत आहे.
या बैठकीस माजी मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते सुनील केदार , खासदार श्यामकुमार बरवे, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भोंयर, तसेच जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे पाटील उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा.अनिकेत मून यांच्या नेतृत्वात पक्षाची भूमिका ठेवण्यात आली. त्यांनी युती संदर्भाने सकारात्मक भूमिका मांडली. तसेच जिल्हाध्यक्ष अजय सहारे, शहराध्यक्ष मंगेश वानखेडे,मार्गदर्शक पंकज टक्कामोरे, जिल्हा कार्यालयीन सचिव वैभव येवले, आय टी सेल प्रमुख शुभम वाहने नागपूर जिल्ह्यातील प्रतिनिधींनी या चर्चेत सहभाग घेतला.


बैठक अत्यंत सकारात्मक स्वरूपाची होती. दोन्ही पक्षांमध्ये भाजप-आरएसएसविरोधात मजबूत पर्याय उभा करण्याबाबत ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली. नागपूर पासून रामटेक पर्यंत नागपूर जिल्ह्यातील विविध नगरपरिषद,नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी युतीबाबत चर्चा पुढे सरकली.
वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची ही युती नागपूर जिल्ह्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद /पंचायत समिती निवडणुकीत एक नव्या पर्वाची सुरुवात होऊ शकते. स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना मिळाल्याने नागपुर जिल्ह्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळु शकते. राजकारणाला नवी दिशा देण्यास ही आघाडी सक्षम ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नागपूर जिल्हा निवडणुकीतील हे राजकीय समीकरण आता अधिक रंगतदार होत असून, विरोधकांना मोठी आव्हाने उभी राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.



































