बसपात सामील होताच रवीभाऊ शेंडे यांची नागपूर जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती
श्री सुनील उत्तमराव साळवे. (9637661378 /9527190782) मुख्य संपादक Vansh News Digital Web portal online
नागपुर 12 डिसेंबर 2025 नागपुरातील सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात प्रसिद्ध समाजसेवी वंचित चे माजी नागपूर शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांनी काल नागपूरातील बसपा मुख्यालयात बहुजन समाज पार्टी चे प्रदेशाध्यक्ष एड. सुनील डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसपात प्रवेश घेतला असून त्यांचेवर नागपूर जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. रवीभाऊ शेंडे हे सुरुवातीला रिपब्लिकन नेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील दलित मुक्ती सेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी मध्ये सक्रिय होते. नंतर ते भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या अखिल भारतीय धम्म सेनेचे विदर्भ प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यानंतर वंचित नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित मध्ये अनेक वर्ष नागपूर शहराध्यक्ष म्हणून सक्रिय राहिले. परंतु नेत्याच्या धरसोड वृत्तीमुळे रवी शेंडे यांनी वंचितला सोडचिट्टी देऊन बसपात प्रवेश घेतला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष एड. सुनील डोंगरे यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षावर, पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे कार्य केल्यास निश्चितच आपल्याला यश येईल आणि यावेळी नागपूर नगरीचा महापौर बसपाचा होईल असा विश्वास व्यक्त केला.

मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडी चे विदर्भ अध्यक्ष भगवान भोंडे, पूर्व विदर्भाचे संयोजक विवेक हाडके, प्रफुल मानके मुरलीधर मेश्राम यांचे सहित शेकडो कार्यकर्त्यांनी बसपात प्रवेश घेतला. त्यानंतर रवी शेंडे यांचा प्रवेश हा नागपूर शहरातील वंचितच्या राजनीतीला मोठा धक्का आहे. फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निळा झेंडा व बसपा शिवाय पर्याय नसल्याचे मनोगत याप्रसंगी रवी शेंडे यांनी व्यक्त केले.

कालच्या या जाहीर प्रवेश सोहळ्याच्या वेळी बसपाचे प्रदेशाध्यक्ष एड. सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव मंगेश ठाकरे, पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, प्रदेश सचिव प्रा सुनील कोचे, भगवान भोंडे, पूर्व विदर्भ झोन प्रभारी विवेक हाडके, प्रफुल मानके, राजेश बोरकर, नागपूर जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर, नागपूर जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, विद्यार्थी नेते प्रा.नितेश कांबळे, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, गौतम पाटील, संजय जयस्वाल, उमेश मेश्राम, राजू चांदेकर, रूपराव नारनवरे, ताराबाई गौरखेडे आदि प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


































