श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी /नागपुर : 30 जानेवारी 2026.
कामठी विधानसभेतील कांग्रेस च्या जिल्हा परिषद च्या माजी सभापती प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे कामठी पं. स. चे उपसभापती आशिष मल्लेवार यांचेसह 50 कार्यकर्त्यांनी काल रात्री भाजपमध्ये प्रवेश केला.
कांग्रेसचे माजी उपसभापती आशिष मल्लेवार यांच्या नेतृत्वात नवनिर्वाचित नगरसेविका प्रिया आशिष मल्लेवार ,नगरसेविका जयश्री मेश्राम , नगरसेवक निकेत देवगडे यांचेसह 50 कार्यकर्त्यांनी काल भाजप नेता, महसुलमंत्री तथा नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोराडी येथील बावनकुळेंच्या निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश घेतला.यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर हे ही प्रामुख्याने उपस्थित होते.
कांग्रेसचे तिन्ही नगरसेवक भाजपात, कांग्रेस ला मोठा धक्का,बिडगाव नगरपंचायत मध्ये कांग्रेस संपली?
बिडगाव नगरपंचायत मध्ये भाजपने विरु जामगडे हे नगराध्यक्ष म्हणून निवडुन आले तसेच येथे भाजप ची एकहाती सत्ता सुद्धा पालकमंत्री बावनकुळेंनी आणली. इथे कांग्रेसचे फक्त 3 नगरसेवक निवडून आले होते. पं. सं. चे उपसभापती आशिष मल्लेवार यांची VANSH NEWS डिजिटल पोर्टल चैनल चे मुख्य संपादक सुनील साळवे यांनी मुलाखत घेतली असता त्यांनी सांगितले की, आमचे 3 नगरसेवक निवडून आले. भाजपची बिडगाव नगरपंचायत मध्ये सत्ता आली. आमच्यासाठी माजी महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे कणखर व डैशिंग नेत्रृत्व होते. परंतु त्यांचे जिल्हा परिषद सर्कल वेगळे झाले व आमच्या बिडगाव मध्ये नगरपंचायत झाली. विकासकामे करतांना आमच्या वार्डात फंड भेटणे अवघड होते. उद्या आमच्या वार्डात विकास झाले नसते तर आमचे मतदार नाराज झाले असते. सध्या नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व कामठी चे आमदार आहेत. विकासासाठी आम्ही भाजप च्या सत्तेत सहभागी होणे आवश्यक होते असेही आशिष मल्लेवार यांनी VANSH NEWS ला सांगितले.
आपण अवंतिका लेकुरवाळे यांचे कट्टर समर्थक आहात आपण अवंतिका लेकुरवाळे यांचेशी भाजप मध्ये जाण्यासंदर्भात काही बोलले होते का? या प्रश्नावर आशिष मल्लेवार म्हणाले,की आम्ही ताईंशी बोललो. त्यांनी भाजप मध्ये जाण्यासाठी मला मनाई केली. तुम्ही विकासनिधी मिळणार की नाही? यांवर काळजी करु नका. आपण यासाठी विशेष प्रयत्न करु.पण तु भाजप मध्ये जाऊ नको असे मला त्यांनी बजावले होते. परंतु आमच्या समर्थक व नगरसेवकांचा आग्रह होता की आपण विकासासाठी भाजपमध्ये जाणे आवश्यक होते म्हणुन आम्ही काल भाजप मध्ये प्रवेश घेतला असे आशिष मल्लेवार यांनी सांगितले. त्याचबरोबर अवंतिका लेकुरवाळे आमच्यासाठी सदैव आदर्श राहतील असेही मल्लेवार म्हणाले.
5 फेब्रुवारी ला कांग्रेसचे 2 हजार कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेणार – आशिष मल्लेवार
आशिष मल्लेवार यांनी यावेळी सांगितले की येत्या 5 फेब्रुवारी 2026 ला बिडगाव च्या चौकात भाजपतर्फे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळपास 2 हजारच्या वर काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मी कट्टर कांग्रेसी विचारधारेची, कोणी कांग्रेस मध्ये गेल्याने काही फरक पडत नाही – प्रा. अवंतिका लेकुरवाळे (माजी महिला व बालकल्याण सभापती, नागपूर जि. प.)
आम्ही प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांचेशी मोबाईल वर प्रतिक्रिया घेतली असता त्या म्हणाल्या की, आशिष मल्लेवार किंवा त्याचसोबत कोणी भाजप मध्ये गेल्याने कांग्रेवर काही परिणाम होणार नाही. आमच्या पक्षाचे काही तिकडे गेले असतील तर आमच्या कांग्रेसमध्ये भाजप चे काही कार्यकर्ते येतील. कुणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही. आम्ही विचारधारेशी समझौता करणार नाही. मी भाजपच्या विरोधात नेहमी आक्रमक राहिले. कामठी विधानसभेत माझ्या एवढा भाजप विरोधात आक्रमक बोलणारा व आंदोलन करणारा दुसरा कोणीही नेता नाही. त्यामुळे भाजप मध्ये मी जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.कांग्रेस पुन्हा जोमाने आक्रमकपणे भाजप विरोधात लढणार असे प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी यावेळी सांगितले.



































