कुणाचे अपयश,नागपुर पोलिसांचे कि राजकारण्यांचे?
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services.
कोराडी /नागपूर : 4 जुलै 2025.
मागच्या वर्षी कोराडी गावचे भाजप चे माजी सरपंच विठ्ठल निमोने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांचे दोन्ही पाय फेक्चर केले गेले. तब्बल दीड महिने रुग्णालयात उपचार घेतांना त्यांचा मृत्यू झाला.
विठ्ठल निमोने यांच्या म्रत्यु नंतर महादुला कोराडीत हळहळ व्यक्त करण्यात आली. खापरखेडा पो. स्टे. ला याप्रकरणी FIR सुद्धा दाखल झाला. लोधी समाजातून या हल्ल्याचा निषेध करीत खापरखेडा पोलीस स्टेशन ला त्यांनी घेराव सुद्धा घातला. परंतु खापरखेडा पोलिसांनी आज 9 महिने उलटले तरी अजुनही खापरखेडा पोलिसांना विठ्ठल निमोने यांचे मारेकरी भेटले नाही. आता हे अपयश एमके कोणाचे? जनते त उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

अतुल पाटील चे मारेकरी फक्त 24 तासात अटकेत, मग विठ्ठल निमोने चे हल्लेखोर केव्हा पकडणार? नागपुर पोलिस,
नागपुर जिल्ह्य़ातील पिपळा डाकबंगला ग्रा. पं चे भाजप चे सदस्य अतुल पाटील यांची हत्या झाल्यावर अवघ्या 24 तासात आरोपी पकडले. यांत कांग्रेमध्ये सरपंचासहित एकुण 5 जणांना आतापर्यंत अटक झाली. या हत्याप्रकरणी स्थानिक भाजप नेत्यांनी संपुर्ण पोलीस यंत्रणा कामी लावली. नागपुर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, DYSP संतोष गायकवड यांनी भाजप नेते मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या आदेशानंतर तपासाची सर्व चक्रे हालवली. व अतुल पाटील चे मारेकरी पकडले. आरोपींच्या मोबाईल चा CDR एकमेकांशी झालेले बोलणे सर्व माहिती मिळवत मोठ्या प्रकरणाचा शोध लागला. परंतु एकेकाळचे कर्मठ माजी सरपंच विठ्ठल निमोने आयांनी भाजपसाठी आपले जीवन अर्पण केले. त्याच विठ्ठल निमोने च्या हत्येचे मारेकरी शोधण्याची तत्परता भाजप नेत्यांनी आतापर्यंत का नाही दाखवली,? ज्यांच्यावर संशयित म्हणून आरोप आहे त्यांच्या मोबाईल चे CDR खापरखेडा पोलिसांनी का नाही मागवले. जसा अतुल पाटील हा भाजपसाठी महत्वाचा होता तशा विठ्ठल निमोने भाजप साठी महत्वाचा नव्हता काय? विठ्ठल निमोने चे मारेकरी शोधण्याचा रस ना तर खापरखेडा पोलिसांना दिसतो ना ही भाजप नेत्यांना यावरुन दिसत नाही. अजूनही विठ्ठल निमोने चा परिवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रृहखात्याकडे आशेने बघतो. अतुल पाटील च्या हत्येत कांग्रेस पदाधिकारी यांचा रोल होता म्हणून भाजप नेत्यांनी यात इंटरेस्ट घेतला.. तर नाही ना अशीही चर्चा रंगली आहे. भाजपचे माजी सरपंच विठ्ठल निमोने यानी तर त्याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी जनप्रतिनिधी यांचे नाव घेत संशय व्यक्त केला होता. भाजप पक्षाची बदनामी.होऊ नये म्हणून तर या संशयितांना राजकीय संरक्षण भेटत तर नाही ना अशी कुजबुज आता महादुला कोराडीत सुरू आहे.

विठ्ठल निमोने च्या प्रकरणा सीबीआय कडे देण्याची मागणी
भाजप चे माजी सरपंच विठ्ठल निमोने यांचेवर झालेला प्राणघातक हल्ला व उपचारादम झालेला त्यांचा मृत्यू या सर्व प्रकरणाचा छडा लावण्यात खापरखेडा पोलिस व नागपुर ग्रामीण पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने हा तपास थेट सीबीआय कडे देण्याची निमोने परिवाराची मागणी आहे. निमोनेंचे मारेकरी कैव्हा पकडणार आणि आम्हाला केव्हा न्याय मिळणार असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला आहे.अतुल पाटील च्या हत्याप्रकरणी भाजप सावनेर विधानसभा ने जी इच्छाशक्ती दाखवली. ती इच्छाशक्ती कामठी भाजप विधानसभा का दाखवत नाही? विठ्ठल निमोने यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यां अठी मागणीसाठी कोराडी भाजप ने कधीच आंदोलन केले नाही. एकही भाजप नेता याप्रकरणी उघड भुमिका घेतांना दिसला नाही, असे का? निमोने च्या परिवारात कोणी पुरुष मंडळी नाही म्हणून विठ्ठल निमोने हत्याप्रकरणात तपास करायचाच नाही अस तर भाजप नेत्यांनी ठरवले नाही ना? म्हणुन या प्रकरणाची आता थेट सीबीआय कोठडी करावी यासाठी लवकरच निमोनै परिवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
