श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital media services
कामठी /नागपुर : 21 जुन 2025
आंतरराष्ट्रीय योग दिन हा फक्त भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगात 21 जुन रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस कॅम्पस येथे योग दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागपुर येथील वायुसेना च्या प्रमुख सहभागातुन या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
वायुसेना, वायुसेना स्टेशन सोनेगाव च्या वतीने माजी राज्यमंत्री व ड्रॅगन पॅलेस च्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे यांना पत्र देवून ड्रॅगन पॅलेस कॅम्पस येथे 21 जुन रोजी वायु सेनेचे समस्त पदाधिकारी व सैनिकांकरिता ड्रॅगन पॅलेस परिसर उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीला ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी मान्यता दिल्यामुळे आज दि. 21 जुन रोजी ड्रॅगन पॅलेस कॅम्पस येथे योग दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचा शुभारंभ सकाळी 7:00 तर समारोप सकाळी 8:30 वाजता करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विंग कमांडर मारवडकर यांनी केले. मोठ्या प्रमाणात वायुसेनेव्या पदाधिकारी व सैनिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

समारोप प्रसंगी ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी वायुसेनेचे प्रमुख मारवडकर यांना कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल धन्यवाद दिले व अश्या पद्धतीच्या अनेक उपक्रमाकरिता ड्रॅगन पॅलेस परिसर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
सहभागी झालेल्या वायुसेनेच्या पदाधिकारी व सैनिकांनी ड्रॅगन पॅलेस च्या मुख्य प्राथना सभागृहामध्ये ध्यान साधना सुध्दा केली.
