श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
कामठी /नागपुर : 22 मार्च 2025
बिडी कामगारांचे नेते व माजी राज्य सभा सदस्य कर्मतिर दादासाहेब कुंभारे यांनी संपूर्ण जीवन बिडी कामगार तसेच इतर कामगारांच्या समाजिक व आर्थिक सबलीकरण करण्याकरिता आपले महत्वपूर्ण योगदान दिले. कर्मविर दादासाहेब कुंभारे यांच्या102 व्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला महसुल मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. तसेच हस्दास विद्यालय, हरदास प्राथमिक शाळा, दादासाहेब कुंभारे विद्यालय मेरी, ड्रैगन इंटरनॅशनल स्कूल, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र च्या वतीने सुध्दा कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांना मानवंदना देण्यात येईल. या प्रसंगी उत्कृष्ट काम करणारे सुनिल वानखेडे व श्रीमती संगीता मानवटकर यांचा सत्कार महसुल मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी सकाळी 10 वाजता पूजनिय भिक्षु संघाच्या उपस्थितीत विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे सर्वप्रथम तथागत गौतम बुध्दांना मेणबत्ती व अगरबत्ती लावून विशेष बुध्द वंदना घेण्यात येईल, तसेच भिक्षु संघाच्या वतीने उपस्थितांना धम्मादेसना देण्यात येईल. यावेळी उपस्थित पूजनिय भिक्षु संघाला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते भोजनदान व कठीण चिवस्दान देण्यात येईल.
24 मार्च 2025 युवा रोजगार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या कर्मवीर दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र येथे युवकांकरिता युवा रोजगार मार्गदर्शन शिवीराचे आयोजन करण्यात आले आहे या शिवीराला सुक्ष्म, लघु व मध्य उद्यम विभागाचे संचालक शिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे अनिल पाठील व समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक पुरण मेश्राम मार्गदर्शन करणार आहेत, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे राहतील या युवा रोजगार शिबीराला मोठ्या संख्येनी युवकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान सागर भावे यांनी केले आहे.
