श्री.सुनील उत्तमराव साळवे (9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
पुणे : 12 मे 2025
बहुप्रतिक्षित इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल केव्हा लागतो? याकडे राज्यभरातील सर्व विद/पालक व शिक्षकांचे लक्ष लागले होते. आता ही प्रतिक्षा लवकरच संपणार असुन दहावी बोर्डाचा परिक्षा निकाल दि. 13 मे 2025 रोजी लागणार असल्याची खात्रीलायक सुत्रांकडुन माहिती पुढे येत आहे.
यंदा 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. या परीक्षेसाठी राज्यातील 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यानंतर विद्यार्थ्यासमोबतच पालकही निकालाची वाट पाहत होते, मात्र ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, अधिकृत संकेत स्थळावर दुपारी 1 वाजता पाहता येणार आहे. उद्या दुपारी 1वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.








दहावीचा निकाल 2025 – कसा तपासायचा?
महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी एकदा निकाल जाहीर झाल्यावर त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतात. यासाठी लॉगिन विंडोमध्ये आवश्यक तपशील भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र बोर्ड एसएससी मार्कशीट 2025 ऑनलाइन कशी डाउनलोड करावी हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप १: अधिकृत वेबसाइटवर जा – mahahsscboard.in, mahresult.nic.in लॉगीन करा.
स्टेप २: मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC निकाल 2025 तपासण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करा
स्टेप ३: दिलेल्या जागेत आवश्यक तपशील भरा
स्टेप ४: महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2025 स्क्रीनवर दिसेल.
