अवैध जात प्रमाणपत्र व ठेकेदारी च्या मुद्यावर कांग्रेसचे पराभूत उमेदवार जाणार कोर्टात!
महादुला नगरपंचायत /नागपुर : 23 डिसेंबर 2025
नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत निवडणुकीचे निकाल काल रविवारी जाहीर झाले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमलता मनोज सावजी (ठाकूर) यांनी नगराध्यक्षापदासाठी विजय मिळवला. त्यांनी कांग्रेसचे च्या सुषमा रंगारी यांचा पराभव केला.
17 सदस्यीय नगरपंचायतीत भाजपने 11 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. काँग्रेसला 5 जागांवर समाधान मानावे लागले, तर शिदे गटाच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली. बसपा,राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांना तर आपले खाते सुद्धा उघडता आले नाही.
महादुला नगरपंचायत निवडणुकीतील वाढीव आरक्षणाचा बसणार भाजप ला फटका?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मधील आरक्षणाची मर्यादा ही 50% च्या आतमधे असणे आवश्यक होते. परंतु महादुला नगरपंचायत निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ही 50% च्या वर गेल्याने महादुला नगरपंचायत निवडणुकीत जिंकुन आलेल्या भाजप च्या काही सीटस् सध्या डेंजर झोनमध्ये आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाढीव आरक्षणाच्या विरोधात याआधी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. राज्य सरकारने शपथपत्र देऊन स्विकारले की,आरक्षण वाढलेय. परंतु कोर्टाने यावर कोणताही निर्णय न देता निवडणुका कोणत्याही परिस्थितीत थांबविता येणार नाही असे सांगितले. निवडणुकीनंतर यांवर सुनावणी घेतली जाणार असे सांगितले.
प्राप्त माहितीनुसार महादुला नगरपंचायत निवडणुकीत आरक्षण हे 65% गेल्याचे बोलले जाते त्यामुळे कांग्रेसचे स्थानिक नेते याविरोधात कोर्टात जाणार. ओबीसींचे व महिला आरक्षण वाढले. त्यामुळे 2 – 3 सीट ओबीसी सीट ह्या सध्या तरी डेंजर झोनमध्ये आहेत. भाजपला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. वाढीव आरक्षणामुळे 2-3 सीट चे आरक्षण धोक्यात येणार त्यामुळे होतील. या ठिकाणी नव्याने निवडणुक होण्याची दाट शक्यता आहे. याआधी नागपुर जिल्हा परिषद निवडणुकीत 15 सीटवरच्या उमेदवाराची निवडणुक अवघ्या दीड वर्षात रद्द होऊन तेथे नव्याने निवडणुक झाली होती. तशीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आहे. महादुला येथे सुद्धा 2-3 सीटवर निवडणुक लादली जाऊ शकते.
तर दुसरीकडे भाजप चे प्रभाग क्र. 2, प्रभाग क्र. 8, व प्रभाग क्र. 15 येथील विजयी उमेदवार यांच्या जात प्रमाणपत्रावर व ठेकेदार असल्याचा आक्षेप येथील कांग्रेसच्या पराभुत उमेदवारांनी घेतला आहे.या तिन्ही भाजप च्या विजयी उमेदवारांविरोधात कांग्रेस चे पराभुत उमेदवार कोर्टात जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहेत.त्यामुळे या तिन्ही भाजप च्या सीट सध्यातरी डेंजर झोनमध्ये आहेत.
महादुला नगरपंचायत निवडणुक प्रभाग निहाय निकाल
मप्रभाग 1- भाजपच्या स्वाती लांडे यांनी काँग्रेसच्या रिचिका राऊत यांचा 324 मतांनी पराभव केला.
प्रभाग 2-भाजपचे अभिजीत सुभाष ढेंगरे यांनी काँग्रेसचे अमोल रमेश कुथे यांचा 12 मतांनी पराभव केला.
प्रभाग 3- काँग्रेसच्या आम्रपाली आकाश सोनारे यांनी भाजपच्या ट्विंकल निशांत पाखिडे यांचा 66 मतांनी पराभव केला.
प्रभाग 4 – भाजपच्या नंदा अरविंद तुरक यांनी काँग्रेसच्या प्रिया अनिल केदार यांचा 221 मतांनी पराभव केला.
प्रभाग 5 – भाजपचे अजय संतलाल सोलकी यांनी काँग्रेसचे विजयकुमार दशरथ सोनवणे यांचा 289 मतांनी पराभव केला.
प्रभाग 6 भाजपचे गोपालसिंग मदनसिंग नौकाणे यांनी काँग्रेसचे निखिल जगदीश खरवडे यांचा 209 मतांनी पराभव केला.
प्रभाग 7 भाजपच्या वैशाली पवन पाखिडे यांनी काँग्रेसच्या अस्मा कासिम वेग यांचा 432 मतांनी पराभव केला.
प्रभाग 8 – भाजपच्या गंगा विजय जैन यांनी शिवसेनेचे (शिंदे) युवराज देविदास मोटघरे यांचा 54 मतांनी पराभव केला.
प्रभाग 9 काँग्रेसच्या पूजा अजय मेश्राम यांनी भाजपच्या रमा बापूराव सोनवणे यांचा 12 मतांनी पराभव केला.
प्रभाग 10 शिवसेनेचे सचिन बाळकृष्ण वानखेडे यांनी काँग्रेसचे विलास गौतम बचाटे यांचा 15 मतांनी पराभव केला.
प्रभाग 11 भाजपचे सोनू कृष्णा उघडे यांनी काँग्रेसच्या शोभादेवी अभय पवनकर यांचा 113 मतांनी पराभव केला.
प्रभाग 12 – कॉंग्रेसचे अतुल श्यामराव मानवटकर यांनी भाजपचे सचिन भानुदास पाटील यांचा 83 मतांनी पराभव केला.
प्रभाग 13-भाजपच्या संध्या पुरुषोत्तम साबळे यांनी काँग्रेसच्या अश्विनी अण्णाजी वानखेडे यांचा 14 मतांनी पराभव केला.
प्रभाग 14-भाजपचे राजकुमार गुड्डू उईके यांनी काँग्रेसचे प्रशांत सुधाकर कोकडे यांचा 227 मतांनी पराभव केला.
प्रभाग 15-भाजपच्या स्वाती दिलीप पटले यांनी काँग्रेसच्या कल्पना मधुकर गवई यांचा 79 मतांनी पराभव केला.
प्रभाग 16 – काँग्रेसच्या प्रतिभा टिळक गजभिये यांनी भाजपच्या शीतल यशवंत मेश्राम यांचा अवघ्या 5 मतांनी पराभव केला.
प्रभाग 17-काँग्रेसचे मंगेश सुधाकर देशमुख, त्यांनी भाजपचे अजय वासुदेव नांदुरकर यांचा 399 मतांनी पराभव केला.
अशाप्रकारे, महादुला नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्षा, 5 काँग्रेस नगरसेवक आणि 1 शिवसेना ( शिंदे), 11 नगरसेवक भाजपचे निवडून आले. महादुला नगरपंचायतीत नगराध्यक्षा सह 11 महिला आणि 7 पुरुष प्रतिनिधी असतील.


































